शिवसेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा

By admin | Published: January 31, 2017 10:59 PM2017-01-31T22:59:40+5:302017-01-31T22:59:40+5:30

स्वतंत्र ताकद दाखवा : दहा तालुक्यांत अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढण्याची शक्यता

Collected in the stomach of Shivsena MLAs | शिवसेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा

शिवसेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा

Next

समीर देशपांडे --- कोल्हापूर --जिल्हा परिषदेत भाजपशी युती करणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे सेनेच्या ग्रामीण भागातील पाच आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. कारण दोन्ही कॉँग्रेसमधील असंतुष्टांच्या सहकार्याने विधानसभा गाठणाऱ्या या आमदारांचा आता खरा कस लागणार असून, त्यांच्या शक्तीची झाकली मूठ आता उघड होणार आहे. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी कागल आणि करवीर वगळता दहा तालुक्यांमध्ये शिवसेना अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढेल, असे सध्याचे चित्र आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्'ातील दहापैकी शिवसेनेचे तब्बल सहा आमदार निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रातील धनुष्यबाणाच्या चिन्हावर इतके आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची चर्चा झाली. या सहापैकी राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
उर्वरित पाच आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्'ातील गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना गावागावांत रुजली असली तरी दोन्ही कॉँग्रेसच्या सहकारी संस्थांच्या तडाख्यात ती भरारी घेऊ शकली नव्हती; परंतु गेल्या विधानसभेला कधी नव्हे ते एवढे यश मिळाले. युतीच्या सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेला फार पुढे जाऊ दिले नाही. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यामध्ये जाहीर शाब्दिक चकमकी घडल्या होत्या. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात अनुपस्थित राहत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे दोन्ही कॉँग्रेसना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
आता तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही भाजपसोबत कुठेही युती करणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केल्याने या ग्रामीण पाच आमदारांची जबाबदारी वाढली आहे. हे आमदार स्वत:च्या मोठ्या गटाच्या जोरावरच आमदार झाले, अशातला भाग नाही. प्रकाश आबिटकर यांना आजरा, भुदरगड, राधानगरीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील असंतुष्टांनी उघडपणे मदत केली.
उल्हास पाटील यांना शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडीने मदत केली आणि ते आमदार झाले; परंतु त्यांना पाठिंबा देणारी बहुजन विकास आघाडी पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेली आहे. सत्यजित पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या मानसिंगराव गायकवाड गटाने मदत केली आणि ते आमदार झाले. हातकणंगले तालुक्यातील दोन्ही कॉँग्रेसच्या राजकारणामध्ये सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. नाही म्हणायला करवीर तालुक्यात चंद्रदीप नरके यांनी आपला स्वतंत्र गट चांगल्या पद्धतीने उभारला आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही त्यांना गट मजबूत करणे सोयीचे ठरले.

Web Title: Collected in the stomach of Shivsena MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.