कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात भरले अनोखे प्रदर्शन, रंगीबेरंगी फुलपाखरांसह दोन हजारांहून अधिक कीटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:51 PM2024-03-14T17:51:22+5:302024-03-14T17:52:23+5:30

कोल्हापूर : सर्वात मोठा पतंग, भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू तसेच ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू पाहण्याची ...

An exhibition of more than two thousand insects along with colorful butterflies at Shivaji University Kolhapur | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात भरले अनोखे प्रदर्शन, रंगीबेरंगी फुलपाखरांसह दोन हजारांहून अधिक कीटक

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात भरले अनोखे प्रदर्शन, रंगीबेरंगी फुलपाखरांसह दोन हजारांहून अधिक कीटक

कोल्हापूर : सर्वात मोठा पतंग, भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू तसेच ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू पाहण्याची संधी बुधवारी विद्यार्थी आणि नागरिकांनी अनुभवली. रंगीबेरंगी फुलपाखरांसह काटीकिडे, टोळ, नाकतोडे, भुंगे, मक्षिका, चतुर, किरकिरे, प्रार्थना कीटक, झुरळ आदी किटकांच्या विविध प्रजाती व प्रकार अनेकांनी कॅमेराबद्ध केले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे विविध संशोधनांतर्गत वेळोवेळी वेगवेगळ्या किटकांच्या प्रजातींचे नमुने वनविभाग आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या सौजन्याने संकलित केले आहे. हे नमुने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम रीतीने जतन करून ठेवण्यात आले आहेत. यातीलच निवडक २२०० किटकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

जैविक अन्नसाखळीमध्ये किटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या किटकांच्या प्रदर्शनाच्या आयोजनामुळे विद्यापीठाच्या नॉलेज टुरिझममध्ये प्राणीशास्त्र अधिविभागाने महत्त्वाची भर घातली आहे, असे मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय भव्य कीटक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. १५ मार्चपर्यंत प्राणीशास्त्र विभागात हे प्रदर्शन सुरू राहणार असून, त्याची सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी वेळ आहे.

यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी कुलगुरूंसह मान्यवरांना प्रदर्शनात मांडलेल्या किटकांच्या प्रजातींची तपशीलवार माहिती दिली. यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी कुलगुरूंसह मान्यवरांना प्रदर्शनात मांडलेल्या किटकांच्या प्रजातींची तपशीलवार माहिती दिली.

काय आहे प्रदर्शनात 

सर्वात मोठा कीटक
एटलास मॉथ हा सर्वात मोठा कीटक
चमकणारे बग
कापूस लालू ढेकूण
प्रार्थना कीटक
गांधील माशी, कुंभार माशी, मधमाशी
एक मधमाशी एका दिवसात किमान १००० फुलांना भेट देते.
प्रवासी टोळ हा एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंतचा पल्ला पार शकतो.
सिकॅडा हा कीटक १७ वर्षांपर्यंत जगतो.
कुंभार माशीकडे अन्न जतन आणि दुसऱ्या किटकास बेशुद्ध करण्याची कला
प्रार्थना कीटक मीलनोपरांत नरास खाऊन टाकतो.

किटकांना पाहून आश्चर्य आणि नवलाई

प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आश्चर्य आणि नवलाई ओसंडून वाहिली. प्राणीशास्त्र अधिविभागाने आपल्या संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भेट देणाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे किटकांच्या प्रत्येक पॅनलभोवती जिज्ञासूंची गर्दी दिसत होती.

Web Title: An exhibition of more than two thousand insects along with colorful butterflies at Shivaji University Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.