गडहिंग्लजमध्ये ‘आयलीग’ ‘आयएसएल’ही खेळणार--राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:52 AM2017-10-26T00:52:36+5:302017-10-26T00:57:00+5:30

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे

 'Aelig' will also play 'ISL' in Gadhinglj - National Football Tournament | गडहिंग्लजमध्ये ‘आयलीग’ ‘आयएसएल’ही खेळणार--राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

गडहिंग्लजमध्ये ‘आयलीग’ ‘आयएसएल’ही खेळणार--राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू झळकणार उद्या प्रारंभ, मातब्बर संघांची नावनोंदणी प्रतिभावान खेळाडूंची खाण समजला जाणारा गोव्याचा सेसा अकादमी संघही तुल्यबळ आहे.

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे. यामध्ये केरळ एफ.सी., चेन्नई एजीएस्, पुणे सिटी एफसी, गोवा सेसा अ‍ॅकॅडमी, बंगलूर डीवायएस या संघांचा समावेश आहे. त्यामुळे या संघांतील आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर उतरतील. उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया स्पर्धेसाठी तब्बल दोन लाखांची बक्षिसे असून, स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्षे आहे.

गडहिंग्लजकरांच्या फुटबॉलप्रेमाला दाद देण्यासाठी देशातील अनेक मातब्बर संघांनी आवर्जून सहभाग घेतला आहे. आपल्या व्यावसायिक अटी बाजूला सारून सोयी-सुविधांचा लहान शहरात अभाव असतानाही भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च मानल्या जाणाºया आयलीग संघांनीही दरवर्षी सहभाग नोंदविला आहे.

द्वितीय श्रेणी आयलीग खेळणारा केरळ एफसी प्रशिक्षक पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन परदेशी खेळाडंूसह स्पर्धेत उतरला आहे. अखिल भारतीय अकाऊंट आॅफ जनरल स्पर्धा विजेता तमिळनाडूतील चेन्नई एजीएसही यंदा नशीब आजमावतो आहे. गडहिंग्लजचा संतोष ट्रॉफी खेळाडू विक्रम पाटील चेन्नईतून खेळेल.

देशातील सर्वाधिक जुनी मानली जाणारी सव्वाशे वर्षांची परंपरा असणाºया आयएफए शिल्ड स्पर्धा विजेता पुणे सीटी एफसी (युवा) हा आयएसएलचा संघही स्पर्धेचे आकर्षण आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) हा पुणे आर्मी संघही तगडा आहे. प्रतिभावान खेळाडूंची खाण समजला जाणारा गोव्याचा सेसा अकादमी संघही तुल्यबळ आहे.

बंगलोरचा डीवायएसएस, हुबळी एफसी, कोल्हापूरचा प्रॅक्टीस् क्लब, चेतना पुसद, सोलापूर एसएसएसआय, बेळगाव, मिरज संघ सहभागी होत आहेत. स्थानिक यजमान उपविजेता गडहिंग्लज युनायटेड, मास्टर स्पोटर्सही कशी कामगिरी करतात याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीचे मानकरीस्पोर्टिंग गोवा, एसबीटी केरळ, पुणे एफसी, एचएएल बंगलोर, ओएनजीसी मुंबई, डीएसके शिवाजीयन्स्, साऊथ युनायटेड आणि बीईएमएल बंगलूर हे या स्पर्धेचे यापूर्वीचे मानकरी आहेत.

Web Title:  'Aelig' will also play 'ISL' in Gadhinglj - National Football Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.