कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:28 IST2017-10-13T22:27:11+5:302017-10-13T22:28:25+5:30

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे.

5 kg baby born in Kolhapur | कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ

कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ

ठळक मुद्देकोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे.बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून हे कोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे.
प्रसुती झालेल्या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात.

माहेर कोल्हापुरात असल्याने त्या प्रसुतीसाठी येथे आल्या. त्या डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे उपचार घेत होत्या. एखाद्या बाळाची उंची किंवा वजन जास्त असेल तर मातेची नैसर्गिक प्रसुती होत नाही. मात्र, या बाळाच्या मातेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.

वजन आणि उंची दोन्हीच्या जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ आहे. यापूर्वी गुजरातमधील बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे. राज्यात पहिल्यांदाच हे पाच किलो वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मले आहे.

सर्वाधिक वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मल्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण आहे. बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.
- डॉ. सरोज शिंदे
 

 

Web Title: 5 kg baby born in Kolhapur