जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:19 PM2024-04-19T12:19:31+5:302024-04-19T12:25:33+5:30

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने 'पुंडलिक पै' यांच्या संकल्पनेतून बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

on the occasion of world book day a unique activity of book street has been organized by pundalik pai in dombivali | जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट

जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने 'पुंडलिक पै' यांच्या संकल्पनेतून बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपासून सुरू झालेल्या भारतातील या पहिल्यावहिल्या उपक्रमामध्ये वाचन प्रेमींसाठी विनामूल्य पुस्तक प्रदान करण्यात येणार आहे. सांस्कृतिक नगरी डोंबिवली मधील फडके रोडवर रविवार, दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात येणार असून सकाळी १० वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट रसिक वाचकांसाठी खुला रहाणार आहे.

वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला जाणार असून त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येणार आहे.

पुस्तकांपासून तयार केलेली 'आय लव्ह बुक्स' ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास आकर्षण असणार आहे. गतवर्षी ४५०० वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती, तर यंदाचे वर्षी सहा हजार वाचनप्रेमी उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ७५०६२९६०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: on the occasion of world book day a unique activity of book street has been organized by pundalik pai in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.