कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्यात

By मुरलीधर भवार | Published: April 14, 2023 07:32 PM2023-04-14T19:32:02+5:302023-04-14T19:32:07+5:30

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Kalyan East Dr. Babasaheb Ambedkar memorial work in final stage | कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्यात

कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्यात

googlenewsNext

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरात उभे राहात असलेले डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार असून पुढील वर्षी येणारी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती स्मारकात अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असे प्रतिपादन कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. नागरिकांच्या याच मागणीचा विचार करत खासदार शिंदे यांनी पुढाकार घेत मागील २ वर्षांपूर्वी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. या स्मारकासाठी उपलब्ध असलेली जागा आरक्षित असल्याने त्याची शासकीय प्रक्रिया करून आरक्षणात फेर बदल करणे महत्वाचे होते. खासदार शिंदे यांनी विक्रमी वेळेत आरक्षणात फेर बदल केले.

या आरक्षण फेरबदलांनंतर अवघ्या तीन महिन्यात १६ मार्च २०२२ रोजी स्मारक उभारणीसाठी एकूण ८ कोटी रुपयांची निविदा काढली. खासदार शिंदे यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्मारकासाठी अतिरिक्त ५ कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. नगरविकास विभागाकडूनही यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात आली होती. या सर्व गोष्टींनंतर १२ एप्रिल २०२२ रोजी स्मारक उभारणीचा भूमिपूजन भव्य सोहळा संपन्न झाला होता. एकूण १३ कोटी रूपये खर्चातून उभे राहत असलेल्या या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त खासदार शिंदे यांनी शुक्रवारी मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत स्मारक परिसरात भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्मारकाची वैशिष्टय

कल्याण पूर्वेतील प्रभाग ड मध्ये १ हजार ३०० चौरस मीटर जागेवर भव्य स्मारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन
स्मारकांच्या भिंतींवर ३ डी चित्र
ग्रंथालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो
सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह

Web Title: Kalyan East Dr. Babasaheb Ambedkar memorial work in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.