नागरिकांनी हाणून पाडला दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Published: April 15, 2023 04:56 PM2023-04-15T16:56:22+5:302023-04-15T16:56:38+5:30

खडकपाडा पोलिसांनी घेतले तीन जणांना ताब्यात

Attempts to steal water pipes of KDMC in broad daylight foiled by citizens | नागरिकांनी हाणून पाडला दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न

नागरिकांनी हाणून पाडला दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न

googlenewsNext

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेचे १७ फूट लांबीचे १४०० मिलीमीटर व्यासाचे ३ टनाचे ३ मोठे पाण्याचे पाईल चोरी करण्याचा प्रकार दिवसाढवळ्य़ा उघडकीस आला आहे. नागरीकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणी घटनास्थळी खडकपाडा पोलिसांनी धाव घेतली. पाईप चोरी करणारे २ ट्रक आणि १ क्रेन चालक अशा तिघांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

मोहने शहाड रोडनजीक जलकुंभाच्या जवळ मोठे पाण्याचे पाईप ठेवले आहेत. हे पाईप दोन ट्रकमध्ये एक क्रेनच्या सहाय्याने भरुन नेत असल्याचा प्रकार जवळच्या नागरीकांच्या लक्षात आला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवित हा चोरीचा प्रकार असू शकतो. नागरीकांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली. खडकपाडा पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सज्रेराव पाटील आणि पोलिस निरिक्षक शरद जिणो यांनी चौकशी सुरु केली. ट्रेकमध्ये पाईप भरुन नेत असलेल्या ट्रक चालकासह क्रेन चालकाला पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हे पाईप भाडेतत्वावर शहाड येथून घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेणार होतो. मोबाईलहून आम्हाला पाईप पोहचविण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार आम्ही हे काम करीत होतो. पोलिसांनी ट्रक आणि क्रेन चालकांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे कैलास लक्ष्मण हाकेकर, राजेश धर्मराज यादव, जयराम रामाप्रसाद जैयस्वाल अशी आहेत. या तिघांना ज्याने मोबाईलहून पाईप नेण्याची ऑर्डर दिली होती. त्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरु आहे. या चोरीमागे नेमका कोणता भंगारमाफिया आहे हे पोलीस तपासा अंती उघड होणार आहे. 

यापूर्वीही मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाईप चोरीचा प्रकार घडला होता. महापालिका हद्दीत पाणी पुरवठा प्रकल्पांची कामे सुरु आहे. त्यासाठी पाईल लाईन मागविल्या जातात. प्रिमिअर कंपनीच्या ग्राऊंडवर मोठय़ा प्रमाणात पाईप ठेवले आहेत. त्याचबरोबर कल्याण पत्री पूल ते ठाकूर्ली दरम्यान दगडखाणीजवळही पाण्याचे पाईप ठेवले आहेत. या पाईपची देखरेख करण्यासाठी महापालिकेन सूरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे शहाड येथील जलकुंभानजीक ठेवलेले तीन टनाचे तीन पाईप चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला. ही चोरी दिवसाढवळ्य़ा केली जात होती. त्यामुळे चोरटय़ाना पोलिसांचे भय राहिले नाही.

Web Title: Attempts to steal water pipes of KDMC in broad daylight foiled by citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.