विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणारी महिला अटकेत

By मुरलीधर भवार | Published: January 16, 2024 01:57 PM2024-01-16T13:57:02+5:302024-01-16T13:57:14+5:30

पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे

A woman who stole a passenger mobile phone in Vitthalwadi railway station was arrested | विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणारी महिला अटकेत

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणारी महिला अटकेत

मुरलीधर भवार, कल्याण: विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असताना एका महिलेने एका प्रवाशाच्या ब’गमधून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी राणी पवार नावाच्या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. राणी हिने आत्तापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत. याचा उलगडा तपासा अंती होणार आहे.

१४ जानेवारी राेजी वि्ठठ्लवाडी रेल्वे स्थानकात लोकल गाडी आली असता एक प्रवासी लोकल पकडण्याच्या तयाकरीत होता. याचवेळी एका महिलेने या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे आणि पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला.

अखेर या प्रकरणी मोबाईल चोरणाऱ्या महिलेस अटक केली. तिचे नाव राणी पवार असे आहे. ती फिरस्ता आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी तिला रेल्वे न्यायालयात हजर केले असता तिला पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी राणीने काही चोरी केली आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: A woman who stole a passenger mobile phone in Vitthalwadi railway station was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक