कल्याणातील आयमेथॉन ४ मध्ये धावणार देशभरातील ३ हजार ५०० धावपटू!

By मुरलीधर भवार | Published: December 9, 2023 04:28 PM2023-12-09T16:28:52+5:302023-12-09T16:29:07+5:30

येत्या १७ डिसेंबर २०२३ रोजी ही आयमेथॉन ४ स्पर्धा होणार आहे.

3 thousand 500 runners from all over the country will run in iMethon 4 in Kalyan! | कल्याणातील आयमेथॉन ४ मध्ये धावणार देशभरातील ३ हजार ५०० धावपटू!

कल्याणातील आयमेथॉन ४ मध्ये धावणार देशभरातील ३ हजार ५०० धावपटू!

कल्याण- अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देशातील दर्जेदार अर्धमॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या कल्याणच्या आयमेथॉन ४ मध्ये यंदाही रेकॉर्डब्रेक धावपटू सहभागी होणार आहेत. या आयमेथॉनला अद्याप १० दिवस शिल्लक असतानाच ३ हजार ५०० धावपटूंनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे. येत्या १७ डिसेंबर २०२३ रोजी ही आयमेथॉन ४ स्पर्धा होणार आहे. त्याद्वारे जमा होणारा सर्व निधी हा समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग संस्थेला दिला जाणार आहे.

या विषयी माहिती देण्यासाठी काल एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ.सुरेखा ईटकर, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. विकास सूरंजे, वरिष्ठ सदस्य डॉ. अश्विन कक्कर डॉ. राजेश राघव राजू यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालीयन आदी मान्यवर उपस्थित होते. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपतर्फे गेल्या ३ वर्षांपासून ही आयमेथॉन अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे.

विशेष म्हणजे पहिल्या स्पर्धेपासूनच या आयमेथॉनमध्ये हजारांच्या संख्येमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर या स्पर्धेसाठी केवळ कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबई परिसरासह पंजाब, केरळमधील धावपटूंनी नाव नोंदणी केली आहे. तर ७६ दिवसांत कन्याकुमारी ते काश्मिर अशी देशाची दोन टोकं धावणारे दिग्गज धावपटू आशीष कसोदेकर आणि नऊवारी साडी नेसून बर्लिन मॅरेथॉनमध्ये गिनीज बुक रेकॉर्ड करणाऱ्या क्रांती साळवी स्पर्धकांचा उत्साह वाढवायला उपस्थित राहणार आहेत.

३ अशा गटात होणाऱ्या या स्पर्धेला दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या रिंगरोड परिसरातून सुरुवात होणार आहे. दुर्गाडी चौक, आधारवाडी चौक, गांधारी रिंगरोड, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो सर्कल, मोहने उड्डाणपूल या मार्गावर हे धावपटू धावतील. तसेच या सर्व मार्गांवर प्रत्येक ठिकाणी ठराविक अंतराने डॉक्टरांची एक टीम अँब्युलन्ससह तैनात ठेवली जाईल. तर ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या महिला आणि पुरुष धावपटूंसाठी दुर्गाडी चौकात फिजिओथेरपीजची सुसज्ज टीम उपलब्ध असणार आहे. तर कल्याणातील ४०० डॉक्टरही या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

Web Title: 3 thousand 500 runners from all over the country will run in iMethon 4 in Kalyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण