प्रो कबड्डी : यू मुम्बा सलामीला पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 12:09 AM2017-07-29T00:09:28+5:302017-07-29T00:09:41+5:30

प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये कायम लक्षवेधी कामगिरी केलेल्या बलाढ्य यू मुम्बाची सुरुवात निराशाजनक झाली. नियोजनबध्द खेळाचा अभाव आणि प्रमुख खेळाडूंच्या अपयशाचा फटका

parao-kabadadai-yauu-maumabaa-salaamailaa-paraabhauuta | प्रो कबड्डी : यू मुम्बा सलामीला पराभूत

प्रो कबड्डी : यू मुम्बा सलामीला पराभूत

Next

प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये कायम लक्षवेधी कामगिरी केलेल्या बलाढ्य यू मुम्बाची सुरुवात निराशाजनक झाली. नियोजनबध्द खेळाचा अभाव आणि प्रमुख खेळाडूंच्या अपयशाचा फटका बसल्याने यू मुम्बाला पुण्याविरुध्द २१-३३ अशा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.
बोनस गुणांचा बादशाह असे बिरुद मिरवणाºया कर्णधार अनुप कुमारने बोनस गुणासह मुंबईचे खाते उघडले. यावेळी, मुंबई वेगवान खेळ करुन आघाडी वाढवणार असे दिसत होते. परंतु, पुणेकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना केवळ आघाडी न घेता, ती आघाडी अखेरपर्यंत कायम टिकवत दणदणीत विजय मिळवला. दहाव्याच मिनिटाला पुण्याने मुंबईवर एक लोण चढवून सामन्यावर पकड मिळवली. यानंतर दडपणाखाली आलेल्या मुंबईकरांवर आणखी दबाव आणत पुण्याने मध्यंतराला १७-१० अशी मोठी आघाडी घेतली. 
मध्यंतरानंतर मुंबईकरांनी पुनरागमनाची शर्थ केली. परंतु त्यांना यश आले नाही. त्यात, मध्यंतरानंतर ५व्या मिनिटाला पुण्याने दुसरा लोण चढवून सामना मुंबईच्या अवाक्याबाहेर नेला. पुण्याकडून संदीप नरवालने अष्टपैलू खेळ करताना ६ गुण मिळवले. कर्णधार दीपक हूडा (५), धरमराज चेरालथन (४) यांनीही चमक दाखवली. मुंबईकडूने अनुपने एकाकी झुंज देताना ८ गुणांसह अष्टपैलू खेळ केला. कुलदीप सिंगने ४ गुण मिळवले.

Web Title: parao-kabadadai-yauu-maumabaa-salaamailaa-paraabhauuta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.