परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 04:36 PM2019-03-30T16:36:35+5:302019-03-30T16:42:37+5:30

वेगवेगळ्या विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याच्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक घटना समोर येत असतात.

Woman arrested at Chennai airport hide gold bars worth 47 lakhs in her bra | परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन!

परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन!

Next

वेगवेगळ्या विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याच्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. तस्करी करण्यासाठी लोक काहीच्या काही कल्पना लावत असतात. चेन्नई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी एका महिलेने असाच कारनामा केला. या महिलेला विश्वास होता की, ती तिचा उद्देश पूर्ण करणार, पण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही महिला पकडली गेली. 

२९ मार्च २०१९ रोजी एक महिला परदेशातून भारतात परतली. मूळची थायलॅंड असणारी क्रायसॉर्न थामप्राकोप नावाच्या या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सांगितले जात आहे की, क्रायसॉर्न मोठ्या शिताफीने दीड किलो सोन्याची तस्करी करत होती. पण तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. 

पार्किंगच्या सीमेजवळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी क्रायसॉर्नला थांबवलं तेव्हा तिला धक्का बसला. आधी क्रायसॉर्नने चलाखी करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिची झडती घेण्यात आली तेव्हा अधिकारीही हैराण झाले. क्रायसॉर्नने तिच्या ब्रामध्ये साधारण दीड किलो सोनं लपवलं होतं. या सोन्याची किंमत साधारण ४७ लाख रूपयांच्या आसपास सांगितली जात आहे. सोबतच कस्टम अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला सुद्धा अटक केली ज्याला क्रायसॉर्न सोनं देणार होती. 

(Image Credit : AmarUjala)

क्रायसॉर्न इथे लवलीन कश्यप नावाच्या व्यक्तीला सोन देण्यासाठी आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, लवलीन चंडीगढचा राहणारा आहे. बॅंकॉकमध्ये लवलीनची गर्लफ्रेन्ड राहते, तिनेच हे सोन क्रायसॉर्नकडे दिलं होतं. 

मीडिया रिपोर्टनुसार, कस्टमच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॅंकॉकमध्ये राहणारी लवलीनची गर्लफ्रेन्ड सपनाने क्रायसॉर्नला हे सोनं दिलं होतं. आणि भारतात लवलीनकडे सोपवण्यास सांगितलं होतं. सपनाने क्रायसॉर्नला लवलीनचा एक फोटोही दिला होता. ज्याद्वारे ती त्याला भेटणार होती. 

सध्या पोलीस या प्रकारणाची खोलवर चौकशी करत आहेत. थायलॅंडची ही महिला याआधीही सोन्याच्या तस्करीत सहभागी होती का? याचा शोध घेणं सुरू आहे. पोलिसांना ही माहिती मिळाली की, लवलीन नेहमीच बॅंकॉकला जात होता आणि तेथून अनेक वस्तू आणत होता. 

Web Title: Woman arrested at Chennai airport hide gold bars worth 47 lakhs in her bra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.