#VIDEO : हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेल्या आजोबांना बरं वाटावं म्हणून कुटूंब नाचलं भांगड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 14:40 IST2018-01-22T14:26:33+5:302018-01-22T14:40:21+5:30
आपल्या कुटूंबाला असं एकत्र पाहून त्या आजोबांच्या चेहऱ्यावरील हास्यही तितकंच आश्वासक वाटतंय.

#VIDEO : हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेल्या आजोबांना बरं वाटावं म्हणून कुटूंब नाचलं भांगड्यावर
मुंबई : महागड्या औषधांनीही जेव्हा आजार बरा होत नाही तेव्हा कुटूंबाचं एकत्र असणं आणि हसणं आजारी माणसाला बळ देतं. असंच काही सांगणारा हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रुग्णालयात बेडवर खितपत पडलेल्या आजोबांना बरं वाटावं याकरता त्यांच्या नातेवाईंकांनी चक्क भांगडा नृत्य केलं आहे.
इतर सोशल व्हायरल बातम्यांसाठी येथे क्लिक करा
नववर्षादरम्यान हा व्हिडीयो बनवण्यात करण्यात आला आहे. त्या शुभेच्छांच्या संदेशासोबतच तो आपल्याला पाहायला मिळतो. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक वयोवृद्ध आजोबा बेडवर पडून आहेत. त्यांना आनंद वाटावा, त्यांनी थोडंसं हसावं याकरता त्यांच्या कुटूंबियांनी रुग्णालयातच भांगडा नृत्य केलं आहे. हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेल्या रुग्णांना बरं वाटण्याकरता त्यांनी आतून आनंदी असणं गरजेचं आहे. महागडी औषधं आणि महागडी उपचारांमुळे सकारात्मका येत नाही तर आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आणि हास्यामुळेच रुग्णांना सकारात्मक वाटत असतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन एका कुटूंबाने आपल्या घरातल्या त्या जेष्ठ व्यक्तीसाठी भांगडा नृत्य केलं आहे. पाहा व्हिडीओ -
आणखी वाचा - दोन तोंड, दोन नाक आणि तीन डोळे असलेली ही मांजर इंटरनेटवर होतेय व्हायरल
या व्हिडिओत दोन तरुणांसोबतच दोन वृद्ध महिलाही नाचताना दिसतात. आपलं वय विसरून आपल्या आजारी माणसाला आनंदी पाहण्यासाठी अगदी जल्लोषात ते भांगडा सादर करतात. आजीबाईंचा ठुमकाही पाहण्यासारखा आहे. एवढंच नव्हे तर आजीबाई आजोबांनाही नाचण्याचा आग्रह करताना दिसताएत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणाचा आहे? या व्हिडिओमध्ये दिसणारं कुटूंब कोणतं आहे? याबाबतची माहिती अद्यापही कळू शकलेली नाही. मात्र फेसबूकवर अनेक पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेटिझन्सने या व्हिडिओ चांगलाच डोक्यावर घेतलाय. आतापर्यंत या व्हिडिओला फेसबूकवर ८० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
आणखी वाचा - #SocialViral : बर्फाने गोठलेल्या नदीत स्केटिंग करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल