इथे दुर्गा देवीला अर्पण केल्या जातात चप्पल आणि सॅंडल, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:40 PM2019-05-08T14:40:43+5:302019-05-08T14:53:16+5:30

सामान्यपणे मंदिरात चप्पल, शूज किंवा सॅंडल घालून जाण्यास मनाई असते. पण एक मंदिर असंही आहे. जिथे दुर्गा मातेला चप्पल आणि सॅंडल चढवल्या जातात.

Unique temple where people offers slippers and sandals to Maa Durga | इथे दुर्गा देवीला अर्पण केल्या जातात चप्पल आणि सॅंडल, कारण वाचून व्हाल थक्क!

इथे दुर्गा देवीला अर्पण केल्या जातात चप्पल आणि सॅंडल, कारण वाचून व्हाल थक्क!

Next

(Image Credit : amarujala.com)

सामान्यपणे मंदिरात चप्पल, शूज किंवा सॅंडल घालून जाण्यास मनाई असते. पण एक मंदिर असंही आहे. जिथे दुर्गा मातेला चप्पल आणि सॅंडल चढवल्या जातात. हे वाचून तुम्हाल आश्चर्य तर नक्कीच वाटेल, पण हे सत्य आहे. यामागचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल. 

हे मंदिर मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. कोलार परिसरातील एका छोट्या डोंगरावर हे दुर्गा देवीचं मंदिर आहे. हे मंदिर जीजीबाई मंदिर म्हणूणही प्रसिद्ध आहे. या मंदिरात जेव्हा लोक येतात तेव्हा देवापुढे काही मागतात आणि ते पूर्ण होण्यासाठी नवीन चप्पल चढवतात. चप्पलसोबतच इथे उन्हाळ्यात इथे देवीला गॉगल, टोपी आणि घड्याळ सुद्धा अपर्ण केली जाते. ही अनोखी परंपरा गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. 

(Image Credit : amarujala.com)

या मंदिरात देवीला चप्पल चढवण्या मागे एक वेगळीच कथा आहे. एका साधुने इथे मूर्ती स्थापन करण्यासोबतच शिव-पार्वतींचं लग्न लावून दिलं होतं आणि स्वत: कन्यादान केलं होतं. तेव्हापासून या देवीची ते आपली मुलगी मानून पूजा करतात आणि सामान्यांप्रमाणे मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. 

(Image Credit : amarujala.com)

हे साधू एका मुलीप्रमाणेच देवी दुर्गाची पूजा करतात. ते सांगतात की, अनेकदा त्यांना अशा भास होतो की, दुर्गा देवी दिलेल्या कपड्यांमुळे खूष नाहीत. तेव्हा ते दोन ते तीन तासातच देवीच्या मूर्तीचे कपडे बदलतात. हे साधू सांगतात की, या मंदिरात देवीसाठी भाविकांनी परदेशातूनही चप्पल पाठवल्या आहेत. कधी सिंगापूर तर कधी पॅरिसहूनही चप्पल येतात. या चप्पल देवीला चढवून लोकांमध्ये वाटून देण्यात येतात. 

Web Title: Unique temple where people offers slippers and sandals to Maa Durga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.