जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:11 PM2019-04-01T12:11:47+5:302019-04-01T12:12:09+5:30

वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरणे आणि वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत नसेल असा क्वचितच कुणी सापडेल. तुम्हालाही हे पसंत असेल तर तुमच्यासाठी एक भारी जॉब ऑफर आहे.

A UK startup will pay you 46 lakh rupees to travel the world and discover vegan food | जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल!

जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल!

Next

(Source: Matador Network)

वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरणे आणि वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत नसेल असा क्वचितच कुणी सापडेल. तुम्हालाही हे पसंत असेल तर तुमच्यासाठी एक भारी जॉब ऑफर आहे. या आलिशान आणि स्वप्नवत नोकरीमध्ये तुम्हाला केवळ फिरायचं आहे आणि वेगन फूड म्हणजेच शाकाहारी पदार्थांचा शोध घ्यायचा आहे. या कामासाठी तुम्हाला कंपनी ४६ लाख रूपये वर्षाला देणार आहे. या पगारासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या खर्चांसाठीही तुम्हाला कंपनीकडून पैसे मिळतील. 

या नोकरीची ऑफर यूकेतील  Vibrant Vegan Co. या कंपनीने दिली आहे. "Director of Taste" या पोस्ट कंपनी लोकांचा शोध घेत आहेत. अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांना जगभरात फिरणे आणि वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करणे पसंत असेल. 

ज्या व्यक्तीची यासाठी निवड होईल त्याला कंपनी भारत, चीन, मेक्सिको आणि जपान या देशांच्या टूरवर पाठवतील. या देशातील वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन या व्यक्तीला कंपनीसाठी वेगवेगळ्या वेगन फूडचा शोध लावायचा आहे. त्यानंतर लोकल हॉटेलवाल्यांकडून रेसिपीमध्ये असलेलं सर्व साहित्य यूकेला पोहोचवण्याची व्यवस्था करायची आहे.  

या कामासाठी निवड झालेल्या व्यक्तीला ४८ लाख रूपये वर्षाला पगार दिला जाणार आहे. या व्यक्तीला आठवड्यातून ३५ तास काम करायचं आहे. येण्या-जाण्याचा खर्च आणि राहण्या-खाण्याचा खर्च कंपनीकडून केला जाईल. तसेच या व्यक्तीला वर्षभरात २८ अधिकृत सुट्ट्या सुद्धा मिळतील.

कंपनीने फाउंडर Burke-Hamilton यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, जगभरात शेकडो  Ingredients आणि Recipes आहे. यूकेतील लोक यापासून वंचित आहेत. मला आशा आहे की, आमचा नवा साथीदार जगभरातील टेस्ट आमच्या फूड चेनमध्ये सामिल करण्यात यशस्वी होईल'. 

Web Title: A UK startup will pay you 46 lakh rupees to travel the world and discover vegan food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.