मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:11 PM2019-04-01T20:11:15+5:302019-04-01T20:11:29+5:30

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील बागसेवनिया भागामध्ये एका विचित्र चोराने उच्छाद मांडला असून लोक त्याच्या त्रासाला कंटाळले आहेत.

Thief who steals bucket and mug and ran away | मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून

मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून

Next

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील बागसेवनिया भागामध्ये एका विचित्र चोराने उच्छाद मांडला असून लोक त्याच्या त्रासाला कंटाळले आहेत. चोर म्हणतं की, मौल्यवान वस्तू चोरणारा. पण हा चोर थोडा विचित्र आहे. हा चोर कोणत्याही मौल्यवान वस्तू चोरत नाही तर बादली, मग, जेवण, बूट आणि सिम कार्ड यांसारख्या गोष्टी चोरतो. या चोराचे फोटो कॉलनीमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. ज्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बागसेवनिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

बागसेवनियामध्ये राहणाऱ्या तक्रारकर्त्या रश्मी यांनी सांगितले की, चोराने त्यांच्या बाथरूमधून बादली, मग आणि साबण चोरला. त्यानंतर त्याने टॅरेसवर जाऊन टाकीतून पाणी काढून आंघोळ केली आणि जुने कपडे तिथेच ठेवून नवीन कपडे घालून निघून गेला. 

रश्मीच्या शेजाऱ्यांनीही या चोराबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यांनी असं सांगितलं की, घरी जेव्हा सगळे झोपले होते. तेव्हा चोराने खिडकीच्या ग्रीलमधून हात आतमध्ये टाकून दरवाजा उघडला. त्यानंतर तो घरामध्ये आला आणि फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ घेतले आणि टॅरेसवर बसून ते सर्व पदार्थ खाऊन उरलेले पदार्थ तसेच ठेवून तिथून निघून गेला. 

साकेत नगरमध्ये या चोराने दहापेक्षा जास्त घरात जाऊन चोरी केली आहे. येथे राहणाऱ्या मुकेश यांनी सांगितले की, चोर त्यांच्या घरातून कपडे चोरून निघून गेला. कपड्यांजवळ मोबाईल होता. परंतु त्याने मोबाईल न चोरता फक्त सिम कार्ड घेतलं आणि तिथून पसार झाला.

एवढचं नाही तर या विचित्र चोराने एका ठिकाणाहून नवीन बूट चोरले आणि जुन्या चपला तिथेच ठेवून गेला. आतापर्यंत याने दहापेक्षा जास्त चोऱ्या केल्या असून सर्व चोऱ्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. 

चोरामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 27 मार्च रोजी लिखित स्वरूपात तक्रार केली होती. परंतु आतापर्यंत चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही अत्यंत छोटी चोरी असून याचा एफआयआरही होऊ शकत नाही.'

Web Title: Thief who steals bucket and mug and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.