सात रंगांच्या पगड्या, सात रंगांच्या रोल्स रॉईस; 'सप्तरंगी' सरदारजींची भारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 05:39 PM2018-07-31T17:39:11+5:302018-07-31T17:48:49+5:30

अनेकदा परदेशात याच पगडी आणि दाढीची खिल्ली उडवली जाते. असंच काहीसं इंग्लंड शहरात एका सरदारजीसोबत झालं. पण त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्या सरदारजीने जे केलं ते सर्वांनाच थक्क करणारं आहे. 

Sikh Man from UK matches his Turban with Rolls Royce for a day challenge | सात रंगांच्या पगड्या, सात रंगांच्या रोल्स रॉईस; 'सप्तरंगी' सरदारजींची भारी गोष्ट

सात रंगांच्या पगड्या, सात रंगांच्या रोल्स रॉईस; 'सप्तरंगी' सरदारजींची भारी गोष्ट

googlenewsNext

(Image Credit: www.sde.co.ke)

डोक्यावरील पगडी आणि दाढी ही शिखांची शान असते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्यासाठी या गोष्टींचं एक धार्मिक महत्वही आहे. कारण शिख धर्मात सरदारांना पगडी आणि दाढी ठेवणं अनिवार्य आहे. पण अनेकदा परदेशात याच पगडी आणि दाढीची खिल्ली उडवली जाते. असंच काहीसं इंग्लंड शहरात एका सरदारजीसोबत झालं. पण त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्या सरदारजीने जे केलं ते सर्वांनाच थक्क करणारं आहे. 

ब्रिटनमध्ये नेहमीच शिख लोकांच्या पगडीची गंमत केली जाते. असाच एक अनुभव सरदार रुबेन सिंह यांना आला होता. ते इंग्लंडमध्ये AlldayPA कंपनीचे सीईओ आहेत. एका इंग्रजाने त्यांच्या पगडीची खिल्ली उडवत पगडीला 'बॅंडेज' म्हटलं होतं. या अपमानाचा सूड घेण्यासाठी रुबीन सिंहने आपल्या सर्वच पगड्यांच्या रंगांनुसार रॉल्स रॉयस कार खरेदी केल्यात.



 



 

रुबेन यांनी हा सगळा किस्सा ट्विटरवर शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, नुकतच माझ्या टर्बन(पगडी) ला बॅंडेज म्हटलं गेलं. टर्बन माझा मुकूट आणि गर्व आहे. रुबीन यांनी त्या इंग्रजाला चॅलेंज केलं होतं की, ते त्यांच्या टर्बनला आपल्या रॉल्स रॉयस कार्ससोबत मॅच करणार आणि ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं. या चॅलेन्जनुसार, रुबेन सिंहने आपल्या पगडीच्या रंगांनुसार प्रत्येक दिवशी आपल्या घरासमोर रॉल्स रॉयस कार उभी केली होती.

म्हणजे ज्या दिवशी लाल रंगाची पगडी त्यांनी परिधान केली त्या दिवशी लाल रंगाची रॉल्स रॉयस त्यांनी घरासमोर उभी केली. असे त्यांनी लागोपाठ ७ दिवस केले. रुबेन यांच्यासोबतचा पहिला फोटो भारतीय बॉडीबिल्डर वरिन्दर गुहमान यांनी फेसबुकवर शेअर केला होता. 

आज अरबपती बिझनेसमन झालेले रुबेन सिंह यांनी कमी वयातच बिझनेस सुरु केला होता. त्यांनी १७ वर्षांचे असताना मिस एटीट्यूट नावाने एक फॅशन चेन सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात ते दिवसाला २० तास काम करत होते. ९० च्या दशकात हा ब्रॅन्ड ब्रिटनमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. पण बिझनेस वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांना त्यांची कंपनी ८० हजार रुपयांना विकावी लागली होती. 

त्यानंतर रुबेन सिंह यांच्याकडून त्यांच्या बिझनेसचा कंट्रोल काढून घेण्यात आला. नंतर २००७ ते २०१७ या काळात त्यांनी आणखी मेहनत केली आणि पुन्हा alldayPA या कंपनीवर पुन्हा कंट्रोल मिळवला. आज ते या कंपनीचे सीईओ आहेत. 

Web Title: Sikh Man from UK matches his Turban with Rolls Royce for a day challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.