गुजराती गाण्यावर नृत्य करणारी महिला मोदींची आई नाहीच; किरण बेदींनी मान्य केली चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 12:39 PM2017-10-20T12:39:58+5:302017-10-20T16:20:42+5:30

किरण बेंदीनी पोस्ट केलेल्या व्हिडीओतील महिला मोदींची आई नसल्याचं अनेक नेटिझन्सने म्हंटलं होतं. त्यानंतर काही वेळानंतर किरण बेदी यांना त्यांची चूक लक्षात आली आहे.

 PM's birthday on Diwali; Video viral | गुजराती गाण्यावर नृत्य करणारी महिला मोदींची आई नाहीच; किरण बेदींनी मान्य केली चूक

गुजराती गाण्यावर नृत्य करणारी महिला मोदींची आई नाहीच; किरण बेदींनी मान्य केली चूक

Next

नवी दिल्ली- पुदुच्चेरीच्या  नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मोदींच्या मातोश्री हिराबेन यां दिवाळीच्या दिवशी गुजराती लोकगीतावर डान्स करत दिवाळी साजरी करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. किरण बेंदीनी पोस्ट केलेल्या व्हिडीओतील महिला मोदींची आई नसल्याचं अनेक नेटिझन्सने म्हंटलं होतं. त्यानंतर काही वेळानंतर किरण बेदी यांना त्यांची चूक लक्षात आली आहे.

काही वेळातच किरण बेदी यांनी पुन्हा ट्विट करून चूक मान्य केली आहे. व्हिडीओमध्ये डान्स करणारी महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई असल्याचा मला गैरसमज झाला. असं म्हणत चूक मान्य केली आहे. तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये किरण बेदी यांनी व्हिडीओमध्ये असणाऱ्या महिलेला सलामही केला आहे. मी 96 वर्षांची झाल्यावर अशी असली पाहिजे, असंही किरण बेदी यांनी या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.  किरण बेदी यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ युट्यूबवर 3 ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला होता.


 '९७ व्या वर्षातही यांचा दिवाळीचा उत्साह पाहण्यासारखा आहे. या नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन आहेत. त्या घरात दिवाळी साजरी करत आहेत,' असं टि्वट किरण बेदी यांनी केलं होतं. किरण बेदी यांनी हा व्हिडिओ टि्वटरवर अपलोड केल्यानंतर त्यावर नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया आल्या. काहीं नेटिझन्सनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्या मोदींच्या मातोश्री नसल्याचा दावा केला. एका वृद्धेचा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ नवरात्रीमधील असल्याचंही युजर्सचं म्हणणं होतं.


Web Title:  PM's birthday on Diwali; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.