आईच्या प्रेमाला उपमा नाही

By admin | Published: May 11, 2017 12:36 AM2017-05-11T00:36:34+5:302017-05-11T00:36:34+5:30

आई शेवटी आईच असते. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना होणारे दु:ख, त्रास सहन करू शकत नाही. मग ती आई मानवाची असेल

Mother's love is not a parable | आईच्या प्रेमाला उपमा नाही

आईच्या प्रेमाला उपमा नाही

Next

आई शेवटी आईच असते. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना होणारे दु:ख, त्रास सहन करू शकत नाही. मग ती आई मानवाची असेल किंवा जनावरांची. त्याने फरक पडत नाही. छायाचित्रातील हे दृश्य मध्यप्रदेशातील जबलपूरमधील आहे. यात जी आई दिसते आहे ती तिचे बाळ मरण पावले आहे, असे समजून रडते आहे. प्रत्यक्षात ते जखमी झालेले होते. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यांत हे दृश्य टिपले. आई दु:खाने विव्हळत होती, तर तिच्या हातात तिचे जखमी बाळ बेशुद्धावस्थेत होते. ज्याने कोणी हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य बघितले त्याचे डोळे पाणावले. वानराचे हे पिलू दुचाकीसमोर येऊन जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हे छायाचित्र टिपणारे अविनाश लोधी यांनी सांगितले की, या छायाचित्रानंतर मी तासभर शांत बसून होतो. अस्वस्थ करणारे हे वातावरण त्या बाळाने डोळे उघडेपर्यंत कायम होते. आपल्या बाळाला जिवंत बघून त्या आईला झालेला आनंद वर्णन न करता येणारा होता.

Web Title: Mother's love is not a parable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.