वॉशिंग्टन : जगात अशी अनेक विमानतळे आहेत जेथे लॅण्ंिडग (उतरणे) आणि टेकआॅफ (उड्डाण करणे) दोन्ही गोष्टी अवघड आहेत. या द्दृष्टीने भूतानचे पारो विमानतळ जगातील सर्वांत खतरनाक मानले जाते. मोठी विमाने तयार करणारी कंपनी बोर्इंगने पारोचा जगातील सर्वांत खतरनाक विमानतळांत याचा समावेश केला आहे. केवळ अनुभवी आणि कुशल वैमानिकच याठिकाणी विमान उतरवू शकतात. त्यामुळेच जगातील केवळ आठच वैमानिक येथे विमान उतरविण्यास पात्र आहेत. भूतान हिमालयाच्या कुशीच वसलेला देश आहे. त्यामुळे येथे उंच पर्वत आणि वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. पारो विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानांना सरळ उभ्या पर्वतांमधून न्यावे लागते. या पर्वतांवर काही काही ठिकाणी घरेही बांधलेली आहेत. पारोची धावपट्टी दुरून दिसत नाही.