गोविंदा स्टाइल डान्सने रातोरात स्टार झालेले काका आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 03:13 PM2018-06-01T15:13:58+5:302018-06-01T15:13:58+5:30

काकांची माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे.

know about sanjeev shrivastav | गोविंदा स्टाइल डान्सने रातोरात स्टार झालेले काका आहेत तरी कोण?

गोविंदा स्टाइल डान्सने रातोरात स्टार झालेले काका आहेत तरी कोण?

Next

मुंबई- कालपासून सोशल मीडियावर गोविंदा स्टाइलने अगदी बिनधास्तपणे नाचणाऱ्या एका काकांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. काकांच्या डान्सने सोशल मीडियावर धमाकूळ घातला असून कित्येकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे. अगदी एकाच दिवसात व्हिडीओतील काका सोशल मीडियावर हिट झाले आहेत. पण हे काका नेमके आहेत तरी कोण ? याबद्दल अजून कुणालाही माहिती मिळाली नाही. या काकांची माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे.

संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू असं त्यांचं नाव असून ते भोपाळच्या विदिशामध्ये राहणारे आहेत. भाभा विद्यापिठात ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. संजीव यांनी नागपूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनच त्यांचा डान्सची आवड आहे. त्यांनी अनेक डान्स शोमध्येही भाग घेतला. संजीव 1982 पासून डान्स करत आहेत. नृत्याची प्रेरणा त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून मिळाली. गोविंदाच्या ‘लव 82’ हा सिनेमा त्यांना अतिशय आवडतो. त्यांनी मध्य प्रदेशात अनेक नृत्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रथन पारितोषिकही मिळवलं आहे. 'एमटेक'चं शिक्षण घेतलेल्या संजीव यांनी 1998साली नृत्याची आवड सोडून प्रोफेसर म्हणून काम करायला सुरूवात केली. 

'मला सकाळी फोन करून डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ 12 मे रोजीचा आहे. माझ्या मेहुण्याच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे. मी आता 46 वर्षांचा आहे. असं काही होईल याची मला कधीच कल्पना नव्हती. लहानपणापासून मला गोविंदा, ऋषी कपूर यांच्या गाण्यांवर डान्स करायला अतिशय आवडतो, असं संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं. 

Web Title: know about sanjeev shrivastav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.