सापांचं वय किती हे कसं समजतं? एक्सपर्टनी सांगितली पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:22 PM2024-04-06T12:22:20+5:302024-04-06T12:22:50+5:30

सापाचं वय किती असतं? त्यांच्या वयाची माहिती कशी मिळते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to know the age of species of snake | सापांचं वय किती हे कसं समजतं? एक्सपर्टनी सांगितली पद्धत...

सापांचं वय किती हे कसं समजतं? एक्सपर्टनी सांगितली पद्धत...

साप हा एक असा जीव आहे ज्याबाबत वैज्ञानिक सतत रिसर्च करत असतात. नुकतंच वैज्ञानिकांनी सापांच्या विषापासून बचाव करण्यासाठी एक कृत्रिम अॅंटी व्हेनम इंजेक्शन तयार केलं. पण तुम्हाला माहीत आहे का की, सापाचं वय किती असतं? त्यांच्या वयाची माहिती कशी मिळते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सापाच्या वयाची माहिती कशी मिळवली जाऊ शकते.

एक्सपर्टनी सांगितलं की, देशात साधारण सापांच्या वेगवेगळ्या 270  प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती गार्डन स्नेकच्या असतात. ज्या रहिवाशी भागात आढळतात. काही जंगलांमध्ये आढळतात. हे फार कमी दिसतात. ठिकाणांनुसार प्रत्येक सापांचं वय वेगळं असतं.

किती असतं सापांचं वय? 

सापांच्या वयाबाबत एक्सपर्ट म्हणाले की, जे जंगलात राहतात किंवा लोकांच्या वस्तीत राहतात जिथे लोकांची वर्दळ जास्त असते. तिथे राहणाऱ्या सापांची मृत्यू लवकर होते. असे साप 8 ते 10 वर्षापर्यंत जिवंत राहतात. पण कॉमन करेत, कोब्रा, रसेल वायपर, सॉ-स्केल्ड वायपरसारख्या सापांचं वय जास्त असतं. ते 15 वर्षापेक्षा अधिक जगतात. 

सगळ्यात जास्त जगणारे साप

जेव्हा सगळ्यात जास्त जगणाऱ्या सापांचा विषय निघतो तेव्हा अजगराचं नाव सगळ्यात वर असतं. अजगरही सापांची एक प्रजाती आहे. अजगरांमध्ये विष नसतं. पण त्यांची पकड इतकी मजबूत असते की, मनुष्याचा जीव निघून जातो. अजगर 25 ते 40 वर्ष जगतात. 

कसं समजतं त्यांचं वय?

एक्सपर्टनी सांगितलं की, सामान्यपणे कोणताही साप पाहून त्याचं वय सांगता येत नाही. पण त्यांचा आकार, त्वचा आणि चमक यांच्या आधारावर त्यांच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. यांच्यात एका काळानंतर वयाची माहिती मिळवणं अवघड होतं. कारण मनुष्यासारखी सापांचीही लांबी एका वयानंतर वाढणं बंद होतं. ते साप आपली त्वचा बदलत राहत असतात.

Web Title: How to know the age of species of snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.