हॉस्पिटलमध्ये दिव्यांग मुलीच्या प्रेमात पडला, उचलून घेऊन पूर्ण केली सप्तपदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 01:11 PM2018-10-26T13:11:34+5:302018-10-26T13:12:16+5:30

असे म्हणतात की, प्रेमासाठी मनाची तयारी असणे गरजेची असते. मनाची तयारी असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. अशीच एक वेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे.

Boy marries disabled girl in Haryana unique love story | हॉस्पिटलमध्ये दिव्यांग मुलीच्या प्रेमात पडला, उचलून घेऊन पूर्ण केली सप्तपदी!

हॉस्पिटलमध्ये दिव्यांग मुलीच्या प्रेमात पडला, उचलून घेऊन पूर्ण केली सप्तपदी!

Next

(Image Credit : NBT)

असे म्हणतात की, प्रेमासाठी मनाची तयारी असणे गरजेची असते. मनाची तयारी असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. अशीच एक वेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही कहाणी आहे अमित आणि रानूची. या दोघांचं प्रेम हे दाखवतं की, प्रेम असेल तर समाज, परिस्थीती, परिवार यांच्याशी कसं लढलं जातं. ही घटना हरयाणातील आहे. 

अमित हा १०वी पास असून तो वेल्डिंगचं काम करतो. त्याची भेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रानूशी झाली. रानूला पाहताच त्याचं तिच्यावर प्रेम जडलं. रानू ही दिव्यांग आहे. तिचे दोन्ही हात आणि पाय निकामी आहेत. तरीही रानू ही बीए. बीएड आहे. अमितच्या परिवाराचा या प्रेमाला विरोध होता. पण शेवटी विजय अमितच्या प्रेमाचाच झाला. त्याने सगळी बंधने झुगारुन रानूसोबत लग्न केलं. रानू ही स्वत:च्या पायांवर उभी राहू शकत नाही म्हणून अमितने तिला उचलून घेऊन सप्तपदी पूर्ण केली. 

घरच्यांचा विरोध झाला तेव्हा अमितने सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने रानूसोबत लग्न केलं. अमितने सांगितले की, 'मी हॉस्पिटलमध्ये वेल्डिंगचं काम करायला जात होतो. रानू तिथे उपचारासाठी अॅडमिट होती. रानूला आई-वडील नाहीत. माझं पहिल्या नजरेतच तिच्यावर प्रेम जडलं. मग मी हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेऊ लागलो'. रानूही अमितचं हे प्रेम पाहून त्याच्यावर प्रेम करु लागली. 

अमित आणि रानूचं लग्न संस्थेच्या कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने करण्यात आलं. या लग्नाचा नजारा सर्वांनाच भावून करणारा होता. म्हणजे एकीकडे पंडित मंगलाष्टकं म्हणत होता आणि दुसरीकडे अमित रानूला उचलून घेऊन सप्तपदी पूर्ण करता होता. 

खरंच हे प्रेम करणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. रानू दिव्यांग असल्याने तिच्याशी कुणी लग्न करायला तयार होत नव्हतं. खरं प्रेम मिळणं कठीण असतं. पण खरं प्रेम मिळाल्यावर काय होतं हे अमित आणि रानूकडे पाहिल्यावर कळून येतं. 

Web Title: Boy marries disabled girl in Haryana unique love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.