काय सांगता? इथे मोफत घर खरेदीची दिली जात आहे ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 01:20 PM2018-12-11T13:20:55+5:302018-12-11T13:23:33+5:30

तुम्ही तुमच्या घरापासून दूर रेन्टच्या घरात राहता? दर महिन्याच रेन्ट देऊन कंटाळले आहात? किंवा तुम्हाला घर खरेदी करायचं आहे आणि त्यात आर्थिक अडचणी येताहेत?

Abandoned homes and property free in Japan, People can take for free | काय सांगता? इथे मोफत घर खरेदीची दिली जात आहे ऑफर!

काय सांगता? इथे मोफत घर खरेदीची दिली जात आहे ऑफर!

googlenewsNext

(Image Credit : Twitter)

तुम्ही तुमच्या घरापासून दूर रेन्टच्या घरात राहता? दर महिन्याच रेन्ट देऊन कंटाळले आहात? किंवा तुम्हाला घर खरेदी करायचं आहे आणि त्यात आर्थिक अडचणी येताहेत? किंवा तुमचे मित्र प्रॉपर्टी खरेदी करत आहेत आणि तुम्ही घेऊ शकत नाहीत, याने तुम्ही तणावात आहात? तर आम्ही तुम्हाला अशी माहिती देत आहोत की, तुम्ही या सर्व समस्या विसरुन आनंदाने उड्या मारायला लागाल. पण यासाठी तुम्हाला जपानमध्ये राहणं सुरु करावं लागेल. कारण इथे तुमची ही समस्या सहज सोडवली जाऊ शकते. 

मीडिया रिपोर्टनुसार, जपानमध्ये जवळपास ८० लाख घरे रिकामी आहेत. यातील जास्तीत जास्त  घरे ही शहरापासून दूर असलेल्या परिसरात आहेत. या रिकाम्या घरांना ऑनलाइन डेटाबेसवर लिस्ट केलं गेलं आहे. यातील काही घरांचं नुकसान झालं असलं तरी हजारों घरे चांगल्या स्थितीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही घरे जवळपास फ्री दिली जात आहेत. 

सरकारी रिपोर्टनुसार, जपानमधील मोठी लोकसंख्या वृद्ध होणे हे याचं मुख्य कारण सांगितलं जात आहे. म्हणजे लोक वेगाने सेवानिवृत्ती घरांमध्ये रहायला जात आहेत आणि तिथेच त्यांचा मृत्यू होतोय. याच कारणाने त्यांची घरे रिकामी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ही घरे देण्यासाठी हव्या तेवढ्या प्रमाणात लोकही नाहीयेत. 

जपानमध्ये प्रत्येक चारपैकी एका पुरुषाचं वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. इथे जन्मदरापेक्षा मृत्यू दर अधिक जास्त आहे. धक्कादायक म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही स्थिती आणखी जास्त बिघडण्याची शक्यता आहे. अंधविश्वासही ही घरे रिकामी असण्याचं एक कारण आहे. कारण जपानमध्ये आत्महत्या किंवा हत्येचे शिकार झालेल्या लोकांची संपत्ती खरेदी करणे अशुभ मानलं जातं. 

Web Title: Abandoned homes and property free in Japan, People can take for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.