भारतातील अशा 10 गोष्टी ज्या मुळात भारतीयच नाहीत, वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:22 AM2018-04-04T11:22:42+5:302018-04-04T11:22:42+5:30

भारतात तळागाळात लोकप्रिय गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या भारतीय नाहीयेत. 

10 things in India that are not Indian at all | भारतातील अशा 10 गोष्टी ज्या मुळात भारतीयच नाहीत, वाचून व्हाल थक्क

भारतातील अशा 10 गोष्टी ज्या मुळात भारतीयच नाहीत, वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

आपण भारतीय आपल्या देशातील प्रत्येक गोष्टींचा अभिमान बाळगतो. त्या गोष्टींवर मेड इन इंडिया असा ठप्पाही आपण लावतो. पण अशाही काही गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या अनेकांना भारतीय असल्याचं वाटतं. मात्र हे खरं नाहीये. अशाच भारतात तळागाळात लोकप्रिय गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या भारतीय नाहीयेत. 

1) समोसा -

प्रत्येक व्यक्ती किमान रोज एक समोसा खातोच. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांमध्ये बुडवून समोसा खाल्ला जातो. यावर गाणीही केली गेली आहेत. पण याने सत्य बदलणार नाही. समोसा हा पदार्थ मुळात मध्य आशियातील आहे. मुघल  भारतात आले तेव्हा ते समोसा भारतात घेऊन आलेत. 

2) बिर्यानी -

शेकडो प्रकारच्या बिर्यानी तुम्ही ऐकल्या असतील. कित्येक बिर्यानी प्रकारच्या तुम्ही खाल्ल्या असतील. पण हा पदार्थ भारतातील नाही. बिर्यानी ही मुघल लोक भारतात घेऊन आले. खासकरुन तुर्की लोक. याने इतक्या वर्षात तुम्ही किती बिर्यानी फस्त केली यात काहीही फरक पडणार नाहीये.  

3) राजमा -

राजम्याची करी किंवा राजम्याचे आणखीही काही पदार्थ तुम्ही किती आवडीने खाल्ले असतील. पण तुम्हाला हे माहीत नाही की, राजमा भारतीय नाही. राजमा हे मेक्सिकन कडधान्य आहे. मेक्सिकोतून ते भारतात आलं. 

4) चहा -

ब्रिटीश लोक भारत सोडून जाताना अनेक गोष्टी भारताला देऊन गेले. त्या काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी आहेत. त्यातील एक चांगली गोष्ट म्हणजे चहा. चहा इंग्रजांनी भारतात आणला. इककेच नाहीतर 1950 पर्यंत भारतात चहा जास्त लोकप्रियही नव्हता. 

5) बाटा

ही खरंतर अनेकांना धक्कादायक बाब वाटू शकते. पण हे खरंय. देशातील सर्वात लोकप्रिय असलेला ब्रॅन्ड हा भारतीय नाही आहे. बाटा हा परदेशी ब्रॅन्ड आहे. झेच फॅमिलीने हा ब्रॅऩ्ड 1894 मध्ये सुरु केला होता. या कंपनीचे जगभरातील 60 देशांमध्ये शोरुम आहेत. 

6) जिलेबी -

जिलेबी हा पदार्थही भारतीय नाहीये. हा पदार्थ पारसी लोकांना भारतात आणला. जिलेबीला पारसी भाषेत झलिबिया आणि अरेबिक भाषेत झलबिया असं म्हटलं जातं. 

7) हॉर्लिक्स

भारतातील हजारों लहान मुले एनर्जीसाठी जे ड्रिंक घेतात ते अनेकांना भारतीय वाटतं. पण हॉर्लिक्स अजिबात देशी नाहीये. ही कंपनी विलियम आणि जेम्स हॉर्लिक्स यांनी 1873 मध्ये सुरु केली होती. आता ही कंपनी यूके येथील एक कंपनी चालवते. 

8) बटाटा-टोमॅटो 

रोजच्या जेवणातील या भाज्या आपण किती आवडीने खातो. पण या भाज्या भारतीय नाहीये असे सांगितल्यावर तुम्हाला काय वाटेल. तुम्ही म्हणाल ही काय फालतूगिरी आहे. पण हे खरंय की, या दोन्ही भाज्या भारतीय नाहीत. टोमॅंटो आपल्याला साऊथ आफ्रिकेकडून मिळाला आणि बटाटा पेरुकडून मिळाला आहे. 

10) कोलगेट

देशातील सर्वात जास्त विकलं जाणारं टूथपेस्ट कोलगेट हे आहे. टूथपेस्ट म्हटलं की, केवळ कोलगेट हे नाव सर्वात पहिले घेतलं जातं. पण हे सुध्दा भारतीय नाहीये. कोलगेट ही एक अमेरिकन कंपनी आहे.

Web Title: 10 things in India that are not Indian at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.