सुरुंग स्फोटात युवती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 05:52 PM2017-09-06T17:52:31+5:302017-09-06T17:58:29+5:30

पिंप्री शिवारात पिकांमध्ये निंदणी करीत असताना घडली घटना

Youth injured in Yuang blast | सुरुंग स्फोटात युवती जखमी

सुरुंग स्फोटात युवती जखमी

Next
ठळक मुद्देभरत महाजन यांच्या शेतात 4 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतात झाला सुरूंगाचा स्फोट निंदणीसाठी वापरली जाणारी खुरपी जोरात लागल्याने झाला मोठा  स्फोट  स्फोटानंतर उडालेल्या दगडांमुळे अफसाना तडवी या युवतीच्या तोंडावर व हातावर झाल्या जखमा

ऑनलाईन लोकमत
के:हाळे, ता.रावेर,दि.6 - तालुक्यातील पिंप्री येथील भरत महाजन यांच्या शेतात 4 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतात सुरूंगाचा स्फोट झाला.   स्फोटामुळे उडालेल्या दगडांनी 17 वर्षीय अफसाना तडवी ही मुलगी जखमी झाली. 
रावेर तालुक्यातील पिंप्री ते के:हाळे वीज उपकेंद्र या रस्त्याचे दुतर्फा काम सुरु आहे. रस्त्याच्या कामासाठी खडी आणण्याचे काम सुरू आहे. यामध्ये फुटलेला सुरूंगाचा एक भाग खडीसोबत भरत महाजन यांच्या शेतात आला. 4 रोजी महिला पिकांची निंदणी करीत होत्या. निंदणीसाठी वापरली जाणारी खुरपी जोरात लागल्याने मोठा  स्फोट झाला. या घटनेनंतर महिलांनी घाबरून शेतातून पळ काढला.  स्फोटानंतर उडालेल्या दगडांमुळे अफसाना तडवी या युवतीच्या तोंडावर व हातावर जखमा झाल्या आहेत. 

Web Title: Youth injured in Yuang blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.