महिलेला वारंवार फोन करणाऱ्यास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:40 AM2019-07-21T00:40:52+5:302019-07-21T00:41:51+5:30

जळगाव : अनाथ व गोरगरिब मुलांसाठी सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करणाºया निहाल हमीद ...

The woman repeatedly stops the caller | महिलेला वारंवार फोन करणाऱ्यास चोप

महिलेला वारंवार फोन करणाऱ्यास चोप

googlenewsNext

जळगाव : अनाथ व गोरगरिब मुलांसाठी सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करणाºया निहाल हमीद बागवान (३०, रा़ शाहुनगर) यास दुपारी स्वत: महिला व तिच्या पतीने चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले़ ही घटना शनिवारी दुपारी १़३० वाजता गोलाणी मार्केटमध्ये घडली़
दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार देण्याचा शहर पोलिसांनी सल्ला दिला़
गोलाणी मार्केटमध्ये स्क्रिन प्रिटींगसह मोबाईलचे दुकान असलेल्या निहाल हमीद बागवान या युवकाने सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
महिलेने बोलण्यास नकारात्मकता दर्शविल्याने या युवकाने महिलेच्या व्हॉटसअप वर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. या फोन नंबरवर महिलेच्या पतीने या युवकाचे नाव मिळविले. गुगलवरून त्यांच्या दुकानाचा पत्ता मिळाल्यानंतर पती-पत्नीने त्याच्या दुकानावर धाव घेतली.
याचवेळी निहाल हा महिलेला फोन करीत असतांना तिच्या पतीसह महिलेने त्याला गोलाणी मार्केटमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर महिलेने चप्पल काढून निहाल याला चोप देत शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर महिलेला सायबर पोलीस स्टेशनला जाणून तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संशयित तरुण निहाल याला शहर पोलीसांनी सायबर पोलीसांच्या स्वाधीन केले.

Web Title: The woman repeatedly stops the caller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव