जळगावात विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच आठवडाभराची बुकींग ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:01 PM2017-12-15T17:01:05+5:302017-12-15T17:08:54+5:30

सध्या केवळ आॅनलाईन बुकींग; काही दिवसात कंपनी सुरू करणार काउंटर

Weekend booking 'full' before flight service begins in Jalgaon | जळगावात विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच आठवडाभराची बुकींग ‘फुल्ल’

जळगावात विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच आठवडाभराची बुकींग ‘फुल्ल’

Next
ठळक मुद्देआठवड्यातील मंगळवार ते रविवार असे सहा दिवस ही सेवाकेंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून एअर डेक्कनचे १९ आसनी विमानशनिवार २३ ते २९ डिसेंबर पर्यंतची जळगावहून मुंबई व परतीच्या तिकीटांची विक्री

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१५ : गेल्या ७ वर्षांपासून विमानतळ सुरू होऊनही जळगावहून विमानसेवेला प्रतिसाद कसा मिळेल? याबाबत साशंक असलेल्या विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली. अखेर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीने जळगावातून सेवासुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. जळगावकरांनीही कंपनीने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला असून २३ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार असताना घोषणा होताच आठवडाभर आधीच २३ ते २९ डिसेंबर पर्यंतची जळगाव ते मुंबई व मुंबई ते जळगाव बुकींग फुल्ल झाली आहे. मात्र कंपनीकडून शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार भाडे आकारणी न करता प्रतिव्यक्ती २५०० रूपये भाडे आकारले जात आहे.
बुधवार दि.१३ रोजी विमानसेवेबाबत घोषणा झाली व १४ पासून कंपनीच्या वेबसाईटवर तिकिटाची बुकींग सुरू झाली. मात्र पहिल्या दिवशी अनेकांना बुकींगबाबत लिंकच सापडली नसल्याची तक्रार होती. मात्र शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल आठवडाभराची म्हणजे २३ पासून २९ डिसेंबर पर्यंतची जळगावहून मुंबई व परतीची तिकीटे विक्री झाली असून प्रत्येक तारखेला ‘सोल्ड’चा बोर्ड लागला आहे.
सुरूवातीच्या कालखंडात या सेवेला प्रतिसाद लाभावा म्हणून प्रति व्यक्ती १४२० रूपये भाडे असेल, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र प्रतीव्यक्ती २१४२ रूपये अधिक ३५८ रूपये टॅक्स असे एकूण २५०० रूपये भाडे एकीकडून आकारले जात आहे.

Web Title: Weekend booking 'full' before flight service begins in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव