जळगाव कृषी बाजार समितीसमोर संकूल उभारणीसाठी दबाबतंत्राचा वापर- व्यापाऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:09 PM2019-06-27T13:09:55+5:302019-06-27T13:12:25+5:30

बाजार समितीच्या विविध ठरावांसह जिल्हा प्रशासनाकडे हरकत सादर

Use of Opposition for the construction of the premises in front of the Jalgaon Agriculture Market Committee - Traders' allegations | जळगाव कृषी बाजार समितीसमोर संकूल उभारणीसाठी दबाबतंत्राचा वापर- व्यापाऱ्यांचा आरोप

जळगाव कृषी बाजार समितीसमोर संकूल उभारणीसाठी दबाबतंत्राचा वापर- व्यापाऱ्यांचा आरोप

Next

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर व्यापारी संकूल उभारणीस महानगरपालिकेची परवानगी नसताना हे संकूल उभारण्यासाठी विकासक राजकीय दबावतंत्राचा वापर करीत, असा आरोप जळगाव मार्केट यार्ड असोसिएशनने केला आहे. या संदर्भात बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे हरकत सादर करून बाजार समितीचे विविध ठरावदेखील त्या सोबत दिले आहे.
परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी बंद पुकारलेला आहे. तो बुधवार, २६ रोजीदेखील कायम होता.
परवानगी नाही
नियोजित व्यापारी संकुलाच्या प्रस्तावावर उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना विकासकाने विनापरवानगी भिंत पाडल्याची तक्रार बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. या सोबतच १० मार्च २०१७ व ७ जून २०१९ रोजी मनपा आयुक्तांनी नियोजित व्यापारी संकुलाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. तरीदेखील विकासक व्यापारी संकुलासाठी ठाम असल्याने व भिंत बांधून दिली जात नसल्याने २४ जून रोजी मनपा आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी हरकत दाखल केल्याचेही जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुळात परवानगी नसली तरी राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
बाजार समितीचा ठराव असताना व्यापाºयांना नोटीस
बाजार समितीमध्ये व्यापाºयांच्या दुकानांसमोर असलेले शेड काढण्यासंदर्भात बाजार समितीने व्यापाºयांना नोटीस दिल्या. त्यानुसार हे शेड काढण्यातही आले. मात्र ३१ मार्च १९८३ रोजी बाजार समितीनेच ठराव करून शेती माल ठेवण्यासाठी व मजुरांच्या रक्षणासाठी शेड उभारण्याची मुभा दिली होती. तसा ठरावही करण्यात आला होता, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. या ठरावाच्या प्रतदेखील जिल्हा प्रशासनाकडे दिल्या आहेत.
या सोबतच शेतीमाल खराब होऊ नये म्हणून १९९१-९२मध्ये बाजार समितीच्या संचालक मंडळाने दुकानांसमोर सिमेंट काँक्रीटीकरण करून दिले होते. आता तेथे माल उतरवू नये, असे बाजार समितीचे म्हणणे असल्याने हा ठरावदेखील जिल्हा प्रशासनाकडे बुधवारी देण्यात आला.
जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनावर कार्याध्यक्ष दीपक महाजन, सचिव सुनील तापडिया यांच्या सह्या आहेत. या वेळी व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Use of Opposition for the construction of the premises in front of the Jalgaon Agriculture Market Committee - Traders' allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव