हिवरखडे बुद्रूक येथे आढळले बेवारस प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 05:44 PM2019-06-16T17:44:04+5:302019-06-16T17:44:37+5:30

अकस्मात मृत्यूची नोंद

The unidentified corpse found here at the Hijarakhade Budruk | हिवरखडे बुद्रूक येथे आढळले बेवारस प्रेत

हिवरखडे बुद्रूक येथे आढळले बेवारस प्रेत

Next


पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या हिवरखेडे बुद्रुक येथे संजय रामदास रोहिमारे यांच्या शेतात ३० वर्षीय पुरुषाचे बेवारस प्रेत आढळले. ही घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
रोहिमारे हे शेतीची कामे दुपारी एक वाजेपर्यंत करत होते, ते काम झाल्यानंतर घरी निघून गेले तोपर्यंत शेतात काहीही नव्हते .परंतु ते निघून गेल्यावर गावातील मुले बकऱ्या चरण्यासाठी त्यांच्या शेतात गेले असता त्यांना तेथे प्रेत आढळून आले. त्यांनी लागलीच बघितलेला प्रकार गावात सांगितला. पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. मयताचे अंदाजे वय ३० असून त्याने राखाडी रंगाची सुट पॅन्ट व आकाशी पांढºया रंगाचे चौकटीचे शर्ट घातलेले आहे. त्याच्या उजव्या हातात काळा दोरा व कडे असून हाताच्या मनगटावर जय भरारी लिहिलेले आहे. तसेच हातावर फुलपाखरासारखे चिन्ह आहे. डाव्या हाताच्या मनगटावर जय भैरी लिहिलेले आहे. वरील वर्णनाच्या इसमाविषयी कोणाला काही माहिती असल्यास जामनेर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. किशोर पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The unidentified corpse found here at the Hijarakhade Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.