जळगावातील १ लाख ६८ हजार खातेदार शेतक-यांना ५६९ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:45 PM2018-02-16T12:45:51+5:302018-02-16T13:20:23+5:30

१ लाख ६८ हजार खातेदारांना लाभ देत जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर

undefined | जळगावातील १ लाख ६८ हजार खातेदार शेतक-यांना ५६९ कोटींची कर्जमाफी

जळगावातील १ लाख ६८ हजार खातेदार शेतक-यांना ५६९ कोटींची कर्जमाफी

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार ७३३ कोटींची कर्जमाफीशेतक-यांनी नोंदणी केलेल्या मिस मॅच यादीतील ८० टक्के प्रस्ताव अपात्र११७ कोटी ७० लाख ९३ हजार ३७३ रुपयांची प्रोत्साहन रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१६ : दुष्काळीस्थिती, शेतमालाला मिळणारे अनियमित भाव आणि अन्य कारणांमुळे त्रस्त असलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हाभरातील १ लाख ६८ हजार खातेदार शेतकºयांना ५६९ कोटी ९२ लाखांची रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे.
शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सर्वाधिक ५६९ कोटी ९२ लाखांची रक्कम खात्यावर जमा करणारा जळगाव जिल्हा हा राज्यात पहिला आहे.
राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्यानुसार शेतकरी कुटुंबांकडून आपले सरकार या पोर्टलवर आॅनलाईन अर्ज भरून पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
११७ कोटींची प्रोत्साहन रक्कम वितरीत
शासनातर्फे पहिल्या टप्प्यात खातेदार शेतकºयांच्या खात्यात १५ ते २५ हजारांची प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात आली.
आतापर्यंत जिल्हाभरातील पात्र असलेल्या शेतक-यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन रक्कम म्हणून ११७ कोटी ७० लाख ९३ हजार ३७३ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
कर्जमाफीसाठी जिल्हाभरातील दोन लाख ६६ हजार अर्जदार शेतकरी कुटुंबांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यातील पात्र असलेल्या शेतकºयांची यादी शासनाने प्रसिद्ध केल्यानंतर ४४० कोटी ८६ लाख ५६ हजार २६९ रुपयांची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर गेल्या आठवड्यात जमा केली होती. त्यानंतर कर्जमाफीच्या जमा होणाºया रकमेत वाढ होऊन गुरुवार १५ फेब्रुवारीपर्यंत हा आकडा ५६९ कोटी ९२ लाखांपर्यंत पोहचला आहे.
मिस मॅच यादीत ८० टक्के अपात्र
जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात काही शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नव्हते. शासनाने अशा शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. ज्या शेतकºयांनी शासनाने सांगितलेल्या नमुना १ ते ६ मध्ये नावे भरलेली नाहीत अशा ८४ हजार ६४६ शेतकºयांची यादी तयार केली आहे. या यादीतील ८० टक्के शेतकरी अपात्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शासनाने कर्जमाफी देताना केलेल्या छाननीमध्ये एक लाख ९१ हजार ६८१ शेतकºयांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. या शेतकºयांच्या खात्यावर ७३३ कोटी १० लाखांची रक्कम जमा होणार आहे.
७३३ कोटींची कर्ममाफी मिळणार
योजनेच्या निकषात न बसणाºया शेतकºयांनी देखील नोंदणी केल्यामुळे सहकार विभागातर्फे पात्र शेतकºयांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार एक लाख ६८ हजार खातेदार शेतक-यांच्या खात्यावर ५६९ कोटी ९२ लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. ७३३ कोटींची कर्जमाफी शेतक-यांना मिळेल.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.