भुसावळ तालुक्यातील शिंदी जि.प.शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:17 PM2018-11-18T16:17:43+5:302018-11-18T16:18:55+5:30

आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाचे देणे लागतो. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिंदी, ता.भुसावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सपकाळे, प्रकाश सपकाळे यांनी या दिवाळीच्या सुटीत शाळेच्या नावाचे बोर्ड, शाळेच्या आवारातील भिंतींवर आकर्षक चित्रे छान चित्र काढून दिली. याद्वारे या शाळेचा जणू कायापालटच झाल्याचे दिसते.

Transformation of Shinde district school in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील शिंदी जि.प.शाळेचा कायापालट

भुसावळ तालुक्यातील शिंदी जि.प.शाळेचा कायापालट

googlenewsNext
ठळक मुद्दे माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम विविध चित्रे रंगविली शैक्षणिक चित्रातून मुलांना होतो मूळाक्षरांचा बोध

भुसावळ, जि.जळगाव : आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाचे देणे लागतो. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिंदी, ता.भुसावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सपकाळे, प्रकाश सपकाळे यांनी या दिवाळीच्या सुटीत शाळेच्या नावाचे बोर्ड, शाळेच्या आवारातील भिंतींवर आकर्षक चित्रे छान चित्र काढून दिली. याद्वारे या शाळेचा जणू कायापालटच झाल्याचे दिसते.
या शैक्षणिक चित्रातून मुलांना मूळाक्षरांचा बोध होतो. त्याचप्रमाणे अंकांची ओळख विविध फुलपाखरे, इंद्रधनुष्य, पक्षी, मुले, मुलींच्या चित्रांमधून करून दिली.
शाळेचे प्राचार्य रमेश पाटील, शिक्षक समाधान जाधव, भगवान बडगुजर आणि मीनाक्षी पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. शिक्षक आणि प्राचार्य यांनी स्वखर्चाने शाळेला एलईडी टीव्हीसुद्धा घेऊन दिला आहे. यांचे संपूर्ण गावकरी मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी यांनी कौतुक केले.


 

Web Title: Transformation of Shinde district school in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.