जळगावात ट्रेडमार्क डाळी बंद, जीएसटीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:46 PM2017-07-22T12:46:09+5:302017-07-22T12:46:09+5:30

आता ट्रेडमार्कचाही आग्रह धरला जात नाही. एकूणच खरेदीदार जीएसटी देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

Trademark pulses shut off in Jalgaon, result of GST | जळगावात ट्रेडमार्क डाळी बंद, जीएसटीचा परिणाम

जळगावात ट्रेडमार्क डाळी बंद, जीएसटीचा परिणाम

Next
लाईन लोकमत / विजयकुमार सैतवालजळगाव, दि. 22 - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीत ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने जळगावात बहुतांश दालमिल मालकांनी ट्रेडमार्क परत केले आहे तर ज्यांनी ते परत केले नसले तरी ट्रेडमार्क डाळी विकणे पूर्णपणे बंद केले आहे. विशेष म्हणजे देशाच्या डाळ उत्पादनात 50 टक्के वाटा असलेल्या जळगावात हे चित्र असल्याने देशाचा विचार केला तर देशभरात 50 टक्के डाळ ट्रेडमार्कविना विक्री होऊ शकते. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीत विविध उत्पादनांवर वेगवेगळे परिणाम झाले आहे. यात दैनंदिन गरजांमध्ये असलेल्या डाळींचा विचार केला तर ब्रॅण्डेड डाळीवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला. यामुळे साहजिकच अगोदरच ट्रेडमार्क व त्यावर सुटय़ा डाळपेक्षा पाचपट कर त्यामुळे या डाळींचे भाव चढेच राहणार. सुटय़ा डाळींना पसंती पाच टक्के जीएसटी लागत असल्याने बॅ्रण्डेड डाळ कोणी घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. विना ब्रॅण्ड डाळ घेतली तर पैसे वाचतात, असा विचार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पूर्वी ब्रॅण्डेड डाळला पसंती देऊन तिची मागणी केली जात होती. मात्र आता ट्रेडमार्कचाही आग्रह धरला जात नाही. एकूणच खरेदीदार जीएसटी देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 15 ते 20 दालमिलनी ट्रेडमार्क केले परत जळगावात 75 ते 80 दालमिल असून जीएसटीच्या या निर्णयामुळे यातील 15 ते 20 दालमिल चालकांनी आपले ट्रेडमार्क परत केले आहे. उर्वरित दालमिल चाककांनी ट्रेडमार्क परत केले नसले तरी त्यांचा वापर मात्र थांबविला आहे. एकूणच जळगावात डाळींसाठी ट्रेडमार्कचा वापर थांबविला आहे. डाळ तिच, केवळ ब्रॅण्ड नाही ग्राहकानेच ब्रॅण्डेड डाळकडे पाठ फिरविल्याने दालमिल चालक व विक्रेत्यांनी ब्रॅण्डेड डाळी विकणे बंद करीत त्याच डाळी ब्रॅण्डविना विकल्या जात आहे. मेहनतीने ट्रेडमार्क मिळविला जळगावातील डाळ देशाच्या विविध भागासह विदेशातही निर्यात होते. येथील दर्जामुळे या डाळींना मोठे ब्रॅ्रण्ड मिळून त्यांना चांगली मागणी होती व आजही आहे. यासाठी दालमिल मालकांनी मोठय़ा परिश्रमाने ट्रेडमार्क मिळविले. मात्र नाईलाजास्तव ते काढून घ्याने लागल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एक टक्के नफ्यावर डाळींचा व्यवसाय केला जातो. त्यात ब्रॅण्डेड डाळवर पाच टक्के जीएसटी लागत असेल व तो ग्राहक द्यायला तयार नसेल तर त्याची झळ दालमिल चालक, विक्रेते यांना सहन करावी लागणार. आर्थिक विचार केला तर यात नफा मिळण्यापेक्षा चार टक्के तोटाच होणार. त्यामुळे पाच टक्के जीएसटी देणे कसा शक्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बंद नंतर सरकारकडे मांडल्या मागण्या ब्रॅण्डेड डाळीवर पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्याने जळगावात दालमिल चालकांनी एक दिवसांचा बंद पुकारला होता. त्यावर काही विचार झाला नसून दालमिल चालकांकडून सरकारकडे आपल्या मागण्या कळविण्यात आल्या आहेत. निर्यात सुरळीत देशात डाळ उत्पादनात 50 टक्के वाटा असलेल्या जळगावातील दालमिलमुळे देशाला मोठय़ा प्रमाणात विदेशी चलन मिळते. सध्या देशात ब्रॅण्डेड डाळींवर जीएसटीचा परिणाम असला तरी विदेशात डाळींची निर्यात सुरळीत असल्याचे सांगण्यात आले. जीएसटीमुळे विना ब्रॅण्डच्या डाळींना मागणी असल्याने अनेक दालमिल चालकांनी ट्रेडमार्क परत केले तर उर्वरित इतर दालमिल चालक, विक्रेते ट्रेडमार्क विना डाळ विकत आहे. मेहतीने मिळविलेले ट्रेडमार्क अनेकांना परत करावे लागले आहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन. जीएसटीमुळे ब्रॅण्डेड डाळींसाठी जादा रक्कम मोजावी लागत असल्याने ग्राहक विना ब्रॅण्ड डाळींनाच पसंती देत आहे. त्यामुळे विक्रेते विना ब्रॅण्ड डाळ विक्री करीत आहे. - प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

Web Title: Trademark pulses shut off in Jalgaon, result of GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.