चोपडा शहरात तीन दुचाकींची जाळपोळ तर एका कारच्या फोडल्या काचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:52 IST2018-01-01T15:50:30+5:302018-01-01T15:52:49+5:30

सोमवारी मध्यरात्री अज्ञात माथेफिरुचे कृत्य

Three bikes were burnt in Chopra city and one car broke | चोपडा शहरात तीन दुचाकींची जाळपोळ तर एका कारच्या फोडल्या काचा

चोपडा शहरात तीन दुचाकींची जाळपोळ तर एका कारच्या फोडल्या काचा

ठळक मुद्देअज्ञात माथेफिरूंनी जाळल्या दुचाकी व वाहनेतीन दुचाकी व कारच्या फोडल्या काचापोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु

आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.१ : चोपडा शहरातील मध्यवस्तीत अज्ञात माथेफिरूंनी तीन मोटारसायकल जाळत एका कारची तोडफोड केल्याची घटना सोमवार १ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अज्ञात समाजकंटकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सोमवार १ रोजी नववर्षाच्या सुरुवातीला पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास गोल मंदिर परिसरातील नेमीचंद जैन यांच्या चारचाकी वाहनाची काच अज्ञात माथेफिरूने फोडून नुकसान केले. तसेच शेखर प्रकाश जैन यांच्या मालकच्या दोन दुचाकी जाळल्या. तर आयडीबीआय बँकेचे कर्मचारी मुकुंदा प्रल्हाद बुवा यांची स्कुटी गाडी अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय पाटील, प्रवीण मांडुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या भागात बसविलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी करीत संशयितांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी उशिरा पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Web Title: Three bikes were burnt in Chopra city and one car broke