या कारणांमुळे चाळीसगाव वनक्षेत्रातील बिबट्या आहे सर्वात घातक

By विलास.बारी | Published: December 1, 2017 06:03 PM2017-12-01T18:03:06+5:302017-12-01T18:12:03+5:30

शिकारीची क्षमता नसलेला किंवा वयोवृद्ध बिबट्या होतो नरभक्षक

For these reasons, Chalisgaon's leopard is the most dangerous | या कारणांमुळे चाळीसगाव वनक्षेत्रातील बिबट्या आहे सर्वात घातक

या कारणांमुळे चाळीसगाव वनक्षेत्रातील बिबट्या आहे सर्वात घातक

googlenewsNext
ठळक मुद्देस्वत:चा प्रदेश नसलेला बिबट्या होतो नरभक्षकबिबट्याचे नैसर्गिक भक्ष्याला प्राधान्यपिल्लांचा दगाफटका होण्याच्या भीतीने बिबट्याच्या मादीकडून हल्लाजखमी व शिकारीची क्षमता नसल्यास नरभक्षक

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१ : चाळीसगाव तालुक्यातील वनक्षेत्रात सहा बळी घेणाºया नरभक्षक बिबट्यामुळे शेतकरी, नागरिक व कष्टकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या जखमी झाला असेल, तो वयोवृद्ध झाल्यामुळे शिकारीची क्षमता नसेल किंवा त्याला लहानपणापासूनच व्यक्तीचे मांस खाण्याची सवय असेल अशा वेळी बिबट्या हा नरभक्षक होत असतो.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने व्यापक मोहिम हाती घेतली असताना बिबट्या मात्र हुलकावणी देत आहे. चाळीसगाव वनक्षेत्रातील भौगोलिकस्थिती पाहता हा नरभक्षक बिबट्या सर्वाधिक घातक असल्याचा अंदाज वन्यजीव अभ्यासकांचा आहे.
बिबट्याचा नरभक्षक होण्याचा प्रवास
पूर्वीच्या काळी साथीचे आजार व दुष्काळीस्थितीमध्ये मृत्यूमुखी पडणाºयांची संख्या अधिक होती. अनेकदा यामुळे गावात एकाच वेळी अनेक नागरिक मृत्युमुखी पडत असत. अशावेळी मृत व्यक्तीला खांदा देण्यासाठी चार खांदेकरी व जाळण्यासाठी पुरेसे लाकडे देखील उपलब्ध राहत नव्हते. त्यावर उपाय म्हणून अनेकदा अशा वेळी मयताच्या तोंडात विस्तवाचा खळा ठेवून त्याला खोल दरीत ढकलून दिले जात होते. वाघ, बिबट्या यासारख्या जंगलातील हिस्त्र प्राण्यांना सहज मानवी मांस उपलब्ध झाल्याने तेव्हापासून तो नरभक्षक झाल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे संशोधन आहे.

स्वत:चा प्रदेश नसलेला बिबट्या होतो नरभक्षक
काही वर्षांमध्ये जळगावसह सर्वत्र बिबट्यांची संख्या ही वेगाने वाढली आहे. सर्वसाधारणपणे बिबट्या किंवा वाघाचे ४० किलोमिटरपर्यंतच्या प्रदेशात वावर असतो. तो आपल्या भागातील राजा असतो. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक बिबट्यांना स्वतंत्र प्रदेश शिल्लक राहिला नाही. त्यामुळे तो दुसºयाच्या प्रदेशात अतिक्रमण करतो, त्या ठिकाणावरून हुसकावल्यानंतर तो दुसºया प्रदेशात स्थलांतरीत होतो. गोंधळलेल्या स्थितीत मिळेल त्याची शिकार करीत नरभक्षक होत असतो.

जखमी व शिकारीची क्षमता नसल्यास नरभक्षक
जंगलामध्ये संचार करीत असताना एखाद्यावेळी जखमी झाल्याने असहाय झालेला बिबट्या तसेच वयोमानानुसार थकलेला व शिकारीची क्षमता नसलेला बिबट्या दुर्बल आणि असहाय व्यक्तींवर हल्ला करीत असतो. नैसर्गिक भक्ष्याची शिकार करण्यासाठी दहावेळा प्रयत्न केल्यानंतर एखाद्यावेळी त्याला शिकार करण्यात यश येते. अशावेळी बिबट्या नागरीवस्तीतील वृद्ध किंवा बालकांवर हल्ला करीत असतो.

पिल्लांचा दगाफटका होण्याच्या भीतीने बिबट्याच्या मादीकडून हल्ला
बिबट्याच्या मादीसोबत पिल्ले असतील आणि मानवाकडून त्या पिल्लांना धोका असल्याचे बिबट्याच्या मादीला वाटत असल्यास ती मानवावर हल्ला करू शकते. त्यासोबतच बिबट्याची मादी नरभक्षक झालेली पिल्लांनी लहानपणापासून पाहिले असतील तर मोठे झाल्यानंतर ते बिबटे देखील नरभक्षक होत असतात.

बिबट्याचे नैसर्गिक भक्ष्याला प्राधान्य
वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार बिबट्या हा मानवाला घाबरणारा प्राणी आहे. एखादा व्यक्ती बिबट्यासमोर आल्यास तो पहिल्यांदा पायावर बसतो. तसेच अनेक किलोमिटर जमिनीवर सरपटत चालत जाण्याची त्याची क्षमता असते. यासोबत तो एखाद्या झाडावर, जुन्या इमारतीत किंवा मोठ्या पाईपांमध्ये राहू शकतो. अशी जीवनशैली असताना बिबट्या सर्वप्रथम नैसर्गिक भक्ष्याला प्राधान्य देतो. मात्र काहीच न मिळाल्यास तो वेळी शिकार करण्याचा प्रयत्न करतो.

 बिबट्या जखमी झाल्यानंतर, त्याची शिकार करण्याची क्षमता नसेल किंवा लहानपणापासून आईसोबत मानवावर हल्ला करीत असेल, अशावेळी बिबट्या नरभक्षक होत असतो. नैसर्गिक भक्ष्य न मिळाल्यास बिबट्या अन्य भक्ष्याचा विचार करतो. चाळीसगाव वनक्षेत्रात नेमका कोणता बिबट्या आहे, हे तो पकडल्यानंतरच लक्षात येईल. याठिकाणची भौगोलिकस्थितीचा अभ्यास केला तर हा बिबट्या हा सर्वाधिक घातक आहे.
-अभय उजागरे, मानद वन्यजीव संरक्षक, जळगाव.



 

Web Title: For these reasons, Chalisgaon's leopard is the most dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.