पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथे ठिबक नळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:10 AM2019-03-02T00:10:47+5:302019-03-02T00:11:59+5:30

पारोळा तालुक्यातील पळासखेडेसीम येथील शेतकरी सुदाम वसंत पाटील यांच्या म्हसवे शिवारातील शेतात असलेल्या १७ हजार रुपये किमतीच्या ठिबकच्या नळ्यांची चोरी झाली. ही घटना दिनांक २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घडली.

Theft of Drip Taps at Palaskheda in Parola Taluka | पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथे ठिबक नळ्यांची चोरी

पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथे ठिबक नळ्यांची चोरी

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील संशयितास अटकवाहनही पोलिसांनी पकडलेवाहनदेखील चोरीचे असल्याचा संशय

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पळासखेडेसीम येथील शेतकरी सुदाम वसंत पाटील यांच्या म्हसवे शिवारातील शेतात असलेल्या १७ हजार रुपये किमतीच्या ठिबकच्या नळ्यांची चोरी झाली. ही घटना दिनांक २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घडली.
म्हसवे शिवारातील गट नंबर ७३२/२ या शेतात अंथरलेल्या ठिबकच्या नळ्याचे ४५ बंडल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत सुदाम वसंत पाटील रा.पळासखेडेसीम यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी मनोहर उत्तम गवारे रा.दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक यास संशयितरित्या एमएच-१५-ईजी-१४३७ या वाहनासह मुद्देमालासह पकडले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. ठिबक नळ्या व गाडीसह आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत हा गुन्हा उघडकीस आला आहे. हे वाहनदेखील चोरीचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले. पुढील तपास हे.काँ. सुनील वानखेडे करीत आहेत.

Web Title: Theft of Drip Taps at Palaskheda in Parola Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.