जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:20 IST2018-10-27T13:15:11+5:302018-10-27T13:20:19+5:30

सिंधी बांधवातर्फे आयोजित तीन दिवसीय वर्सी महोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

sindhi community varsi festival in jalgaon | जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ

जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ

जळगाव : सिंधी बांधवातर्फे आयोजित तीन दिवसीय वर्सी महोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता संत बाबा हरदासराम साहेब व संतबाबा गेलाराम साहेब यांच्या समाधीला पंचामृत स्रानाने करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता विश्वशांती यज्ञ करण्यात आला. 

महोत्सवासाठी  देशभरातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य सिंधी पंचायत यांच्यावतीने पू़. संत कंवरराम यांचा 61 वा वर्सी महोत्सव, संत बाबा हरदासराम साहब यांचा 41 वा तर संत बाबा गेलाराम साहब यांचा  10 वा वर्सी महोत्सव 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असून यानिमित्त सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: sindhi community varsi festival in jalgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव