भडगाव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा एकमेव अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:49 PM2019-03-13T17:49:14+5:302019-03-13T17:51:16+5:30

भडगाव येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बहुमत असतानाही राष्टÑवादीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. परिणामी शिवसेनेचे अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

Shivsena's only application for Bhadgaon municipal post was filed | भडगाव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा एकमेव अर्ज दाखल

भडगाव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा एकमेव अर्ज दाखल

Next
ठळक मुद्देबिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा१९ मार्च रोजी होणार अधिकृत घोषणाबहुमत असतानाही राष्टÑवादीने दाखल केला नाही अर्ज

भडगाव, जि.जळगाव : येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बहुमत असतानाही राष्टÑवादीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. परिणामी शिवसेनेचे अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत होती.
नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे दाखल केला. यावेळी मावळते नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.वसीमबेग मिर्झा, नगरसेविका करुणा देशमुख, नगरसेविका रंजना पाटील, स्वीकृत नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, सहकार क्षेत्रप्रमुख युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.दिनकर देवरे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख जे.के.पाटील, माजी उपनगराध्यक्ष आनंद जैन, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, शांताराम पाटील, प्रदीप महाजन, तुषार भोसले, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, नाना चौधरी, लखीचंद पाटील, नीलेश पाटील, आबा चौधरी, रमेश भदाणे, रुषी पाटील, बापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेनेने ठरविल्यानुसार अतुल पाटील यांचा नूतन नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेसह नगरसेवकांची बैठक घेतली. नगरसेवक सहलीवर रवानाही करण्यात आले होते. शिवसेनेची खेळी यशस्वी ठरली, तर दुसरीकडे राष्टृवादीचे बहुमत असतानाही ना पक्षाची बैठक झाली. नगराध्यक्षपदासाठी एकाही राष्टृवादीच्या नगरसेवकाचा अर्ज दाखल झाला नाही. परिणामी शिवसेनेचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी तहसीलदार गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
गेल्यावेळी शिवसेनेने अपक्ष व भाजपा यांच्या मदतीने शिवसेनेचे राजेंद्र पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळाली होती. ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी ६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहे आहेत. सध्या राष्टÑवादी १०, शिवसेना ९, भाजप १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. मागीलवेळी अपक्ष व भाजपा यांच्या मदतीने शिवसेनेचे राजेंद्र पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. आताही नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे.

भडगाव पालिकेत आमचे राष्टÑवादीचे बहुमत जरी असले तरी आमच्या पक्षाचा १ नगरसेवक व १ अपक्ष नगरसेवक हे शिवसेनेसोबत होते. राष्टÑवादीच्या नगरसेवकांची याबाबत चर्चा झाली. प्रयत्नही झाले. परंतु या प्रकाराने नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रमुख दावेदारांनी पक्षाकडून अर्ज भरण्यास नकार दिला. यामुळे राष्टÑवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
-प्रशांत पवार, गटनेता, राष्टÑवादी काँग्रेस, नगरपालिका, भडगाव

Web Title: Shivsena's only application for Bhadgaon municipal post was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.