अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचा-यांना जळगाव शहरात शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 09:45 PM2018-02-12T21:45:34+5:302018-02-12T21:47:57+5:30

दाणाबाजार परिसरातील जुना कापड बाजार गल्लीत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांना शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता घडली. याप्रकरणी शोएब शकील शहा व शकील शहा या दोघांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

Shivigal in Jalgaon city, to the employees who went to remove encroachment | अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचा-यांना जळगाव शहरात शिवीगाळ

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचा-यांना जळगाव शहरात शिवीगाळ

googlenewsNext
ठळक मुद्देट्रॅक्टरला आडवे झाले दोघं जण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाणाबाजारातील घटना

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ :  दाणाबाजार परिसरातील जुना कापड बाजार गल्लीत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता घडली. याप्रकरणी शोएब शकील शहा व शकील शहा या दोघांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
मनपाचे पथक जुना कापड बाजार गल्लीत ट्रॅक्टर घेऊन गेले असता शोएब शकील शहा व शकील शहा हे दोघं जण ट्रॅक्टरच्यासमोर आडवे झाले. यावेळी ज्ञानेश्वर तुकाराम कोळी या  कर्मचा-यांनी दोघांची समजूत घातली, मात्र त्यांनी अश्लिल शिवीगाळ करुन दमदाटी केली. त्यामुळे कोळी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोघांविरुध्द तक्रार दिली.

Web Title: Shivigal in Jalgaon city, to the employees who went to remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.