शिरसोली येथेही बंद घराचे कुलुप तोडून लांबविला ८७ हजाराचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 09:55 PM2017-10-31T21:55:09+5:302017-10-31T22:00:35+5:30

शहर व परिसरात चोरट्यांची दिवाळी धमाका सुरुच असून सोमवारी कुसुंबा येथे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसºयाच दिवशी मंगळवारी शिरसोली (प्र.न.) येथेही बंद घराचे कुलुप तोडून ७१ हजाराचा ऐवज लांबविण्या आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

In Shirsoli, the lock of the house was reduced and 87 thousand rupees were lost | शिरसोली येथेही बंद घराचे कुलुप तोडून लांबविला ८७ हजाराचा ऐवज

शिरसोली येथेही बंद घराचे कुलुप तोडून लांबविला ८७ हजाराचा ऐवज

Next
ठळक मुद्देचोरट्यांची दिवाळी धमाकाडाळीच्या डब्यातील ऐवज लांबविलाघरातील लोखंडी तिजोरी फोडली

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३१  : शहर व परिसरात चोरट्यांची दिवाळी धमाका सुरुच असून सोमवारी कुसुंबा येथे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसºयाच दिवशी मंगळवारी शिरसोली (प्र.न.) येथेही बंद घराचे कुलुप तोडून ७१ हजाराचा ऐवज लांबविण्या आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शिरसोली प्र.न.येथील सुनील नारायण बडगुजर जैन व्हॅली येथे  वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. दिवाळीनिमित्त माहेरी मांडळ (ता.अमळनेर) येथे माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी ते सोमवारी घराला कुलुप लावून गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांना गावातून मामा समाधान बडगुजर यांनी फोन करुन घराचा कडी कोयंडा व कुलुप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने शिरसोली गाठले.  घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसले, तर आतील लोखंडी कपाटातील तिजोरी फोडून साहित्य, कपडे फेकलेले दिसून आले.
डाळीच्या डब्यातील ऐवज लांबविला
 कपाटात काही हाती न लागल्याने चोरट्यांंनी स्वयंपाक घरातील धान्याचे डबे अस्ताव्यस्त फेकून उडीद डाळीच्या डब्यात लपवून ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यात ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅमची अंगठी, १२ हजार रुपये किमतीचे कानातले पाच ग्रॅम वजनाचे टोंगल, चार हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या बाह्या व दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के असा ऐवज गेला आहे.
मुले पळविणारी टोळी समजून भिकाºयांना मारहाण
दिवाळीचा फराळ मागण्यासाठी घरोघरी फिरत असलेल्या भिकारी तीन महिला व एका पुरुषाला मुले पळविणारी टोळी समजून गावकºयांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता बारी नगरात घडली. अंगणात खेळत असलेल्या लहान मुलांना आई कुठे गेली असे या भिकाºयांनी विचारले. त्यांना पाहून मुले घाबरले. त्यामुळे गावातील काही जणांनी मुले पळविणारे असल्याचा गैर समज करुन या भिकाºयांना मारहाण केली. पोलीस पाटील शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या भिकाºयांना पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.


 

Web Title: In Shirsoli, the lock of the house was reduced and 87 thousand rupees were lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.