वाघूरच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:37 AM2018-12-15T01:37:53+5:302018-12-15T01:39:15+5:30

भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी आपण मुंबई येथे मंत्री महाजन यांची भेट घेऊन पुन्हा पाठपुरावा करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले.

In the sanctity of the farmer's movement for Waghur's water | वाघूरच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

वाघूरच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

Next
ठळक मुद्देकुºहे (पानाचे) येथील शेतकरी जलसंपदा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याच्या तयारीतआमदार संजय सावकारे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी आपण मुंबई येथे मंत्री महाजन यांची भेट घेऊन पुन्हा पाठपुरावा करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले.
यावेळी व्यासपीठावर जि.प.चे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, पं.स.च्या माजी सदस्या अलका पारधी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश जोशी, नारायण सपकाळे, फेकरी येथील प्रशांत निकम, ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे आदी उपस्थित होते.
शेतीला वाघुर धरणातील बॅक वाटरचे पाणी उपसा सिंचनाद्वारे मिळू शकते. त्यासाठी गावाची पाणी समिती स्थापन करून व त्याचे बील शेतकºयांना भरावे लागेल,अशी माहिती आमदार सावकारे यांनी या बैठकीत दिली. यासंदर्भात महाजन व अधिकाºयांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, जलसंपदामंत्री महाजन यांची व अधिकाºयांचे मुंबई येथे बैठक घेऊ. या बैठकीसाठी आपण काही लोक मुंबईला या, अशी सूचना आ.सावकारे यांनी केली. त्यावेळी जि.प.सदस्य माजी सदस्य पवार व सुभाष पाटील यांनी बैठकीसाठी येण्याचे मान्य केले . त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरावर कुºहे पानाचे येथून पायी मोर्चा नेण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.
दरम्यान, कुºहे पानाचे येथे ओझरखेडा प्रकल्पातून शेतीला पाणी मिळणार असल्याची माहिती आ.सावकारे यांनी दिली. यावेळी जि.प.माजी सदस्य पवार यांनी या प्रकल्पाचे पाणी निम्मे क्षेत्राला मिळणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्यांनी उर्वरित भागातसुद्धा आपण पाईपलाईन टाकून त्या भागालाही सिंचनाखाली आणू, असे आश्वासन दिले, तर सुभाष पाटील यांनी पाच ते सहा इंची पाइपलाइन टाकून प्रकल्पातूनच टाका व येथील प्रकल्प भरून देण्याची व्यवस्था करा, अशी मागणी केली. त्यावेळी आ.सावकारे यांनी वाघुर प्रकल्पातूनही शेतीसाठी पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक किरण कळसकर यांनी केले. ग्रा.पं.सदस्य नारायण कोळी, विलास चौधरी, जितेंद्र नागपुरे, शिवाजी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन राजू पाटील, किशोर वराडे, बंडू वराडे, प्रमोद उंबरकर, प्रवीण नागपुरे, सुरेश पाटील, भास्कर चौधरी , भागवत टोंगळे, रवींद्र पाटील, शेषराव पाटील, नाना गांधेले, माणिक गांधेले, दिनकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: In the sanctity of the farmer's movement for Waghur's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.