उसणवारीचे पैसे परत मिळत नसल्याने मध्यस्थी तरुणाचा आत्यहत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:01 PM2018-07-30T13:01:39+5:302018-07-30T13:04:32+5:30

ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून घेतले पैसे

Since the rationing money is not being paid back, the intervention of the mediated youth is to try | उसणवारीचे पैसे परत मिळत नसल्याने मध्यस्थी तरुणाचा आत्यहत्येचा प्रयत्न

उसणवारीचे पैसे परत मिळत नसल्याने मध्यस्थी तरुणाचा आत्यहत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकनाशी येथील रहिवासीतरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार

जळगाव : सोबत काम करणाऱ्या मजुरास ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून उसनवारीने घेऊन दिलेले पैसे संबंधित मजूर परत देत नसल्याने मध्यस्थी करणाºया किशोर श्यामराव भील (३५, रा. कनाशी) यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी घडली. या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयात किशोर भील यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, किशोर भील मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोबत काम करणाºया दुसºया एका मजुरास मध्यस्थी राहून ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून उसनवारीने पैसे घेऊन दिले होते. पैसे मिळत नसल्याने मुकडदमाकडून पैशासाठी तगादा लावला जात आहे. भील हे संबंधित मजुरास पैसे मागत असूनही तो देत नाही व दुसरीकडे मुकडदमाचा तगादा यामुळे भील हे अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त आहे.
त्यांची पत्नी माहेरी गेलेली असताना व आईदेखील बाहेर गेलेली असताना भील यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

Web Title: Since the rationing money is not being paid back, the intervention of the mediated youth is to try

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.