रागे रागे विखुरती धागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 02:14 AM2019-05-18T02:14:12+5:302019-05-18T02:14:28+5:30

माणसाला राग येतो तो विविध प्रकारांनी. या रागाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लेखमाला लिहिताहेत जळगाव येथील शिक्षिका प्रिया सफळे... या लेखमालेतील पहिला भाग...

Rage Rage Sprinkled Thread | रागे रागे विखुरती धागे

रागे रागे विखुरती धागे

Next

शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, कर्नाटकी संगीत इ़इ़ संगीत विविध रागांवर आधारलेलं़़़ या रागांचा आगळाच बाज़़़ अरे हो हो़़़़ संगीत़़़ राग याविषयीचा उहापोह नाही करायचाय़ आपल्या मानवी स्वभावाला अनेक कंगोरे आहेत़़़़ अनेक वैशिष्ट्ये आहेत़़़ एकाच आईच्या कुशीतून येणारी बाळंही भिन्न स्वभावाची असतात़़़ इतकंच काय जुळ्यांचे स्वभावही भिन्न असतात़़़ सद्गुण-दुर्गण प्रत्येकात आहेतच़ शांत-तापट, प्रेमळ-तुसडा, गर्विष्ठ-निगर्वी, कोमल-कठोर, भिडस्त- स्पष्ट़़़़ असे कितीतरी प्रकाऱ़़ एक प्रकाऱ़़़ असा की जो प्रकट करण्याचेही अनेक प्रकार आहेत.एक स्वभाव वैशिष्ट जे प्रत्येकाच्या ठायी कमी आधिक प्रमाणात असतंच ते वैशिष्ट़्य स्वभावदोष़़़ म्हणजे राग ! राग !! राग !!!
चला तर मग या राग-चळवळीत आपल्या ठायी कोणता राग दडलेला़़़ दडलेले आहेत ते पाहू़़़ तेही राग न येता़़़
१. कुरकूर- बऱ्याच आबालवृद्धांपर्यंत या रागाची लागण दिसते़ एखाद्या गोष्टींंसाठी कुरकूर करत राहणे आणि ती मिळत नाही तोपर्यत चालू ठेवणे़़ तोंडातल्या तोंडात ही कुरकूर सुरूच ठेवणे़ कुरकूरीतून कुरबूर आणि नंतर किरकीरत कटकटीत रूपांतर होतं़ सतत छोट्या-छोट्या कामासाठी कुरकुरणारे आपल्या आजूबाजूस असले की, अशा कुरकुरणाऱ्यांपासून दूर राहणे लोक पसंत करतात़
२. चिडचिड - छोट्या-छोट्या कारणांसाठी हा प्रकार व्यक्त होतो. उदा. परीक्षा सुरू असताना लोडशेडिंग सतत होत राहतं़ पाणी वेळेवर न येणे़ परीक्षेत अपयश किंवा अपेक्षित यश न आल्यास़, पगार वेळेवर न झाल्यास, घेणेकरी दारात उभे राहिल्यास़, थोडक्यात बस चुकल्यास़, आणि लाईट गेले़, इनव्हर्टर डाऊन झालं आणि मोबाइल डिस्चार्ज झाल्यास अशी कितीतरी उदा़ सांगता येतील़ ही चिडचिड स्वत:भोवतीच फिरते़ व्यक्ती आधी स्वत:वर मग संबंधित व्यक्तींवर आणि मग यंत्रणेवर चिडते़
३. धुसफूस- काही लोकांना नेमकं काय झालंय, कोणत्या कारणानं राग आलाय तेच कळत नाही़़़ पण त्यांच्या देहबोलीतून ते जाणवते़ अशी व्यक्ती प्रत्येक कृती धुसफूस करतात. मग ते खाणं असो, एखादं काम असो़, अभ्यास असो़ ती धुसफूस पाहून समोरचा वैतागतो़ अरे बाबा कशाचा राग स्पष्ट बोल ना; पण नाही़ हे लोक धुसफूसतच राहतात़
४. रुसवा- काहीजण छोट्या- छोट्या कारणांनी रूसतात़ आई-बाबांनी एखादी गोष्ट हट्ट करूनही ऐकली नाही की समज आलेलं बाळ रूसतं. मग गाल फुगवत कोपºयात, जिन्याखाली, बेडखाली, जिथं लपता येईल तिथं लपून बसतं़ असाच रूसवा त्याचा/तिचा असतो. दोघांचा रूसवा अबोल्यात जातो़ हा अबोला लवकर मिटला नाही तर रूसव्याचं रूपांतर कोणत्याही राग प्रकारात होऊ शकतं़
५. नाकावरचा राग- शुल्लक गोष्टीवरून धुमसणारी बरीच मंडळी असतात़ यांना कधी खळखळून हसलेलं कुणी पाहिलंच नसतं़़ सतत जगाचं टेन्शन यांच्या मुखावर दिसतं किंवा मग प्रत्येक गोष्टीत चुका काढण्यात ते पटाईत असतात आणि समोरच्याचं काही सुनावलं तर यांच्या नाकावरचा राग प्रदर्शित होतो. त्यांचं नाक लाल होतं़ ते छोटं-मोठं़ चाफेकळी कसंही असो़़ मग डोळे मोठे होतात़ संपूर्ण चेहरामोहरा बदलून जातो़ जणू काही स्वत: कधी चुकतंच नाहीत़़ परफेक्ट समजतात स्वत:ला. एकूण काय नाकावर राग घेऊनच ते जगत असतात़ (क्रमश:
-प्रिया सफळे, जळगाव

Web Title: Rage Rage Sprinkled Thread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.