बोदवड तालुक्यातील येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 02:56 PM2019-01-27T14:56:39+5:302019-01-27T14:58:14+5:30

येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रुग्णांचे व येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.

Problems in Yevati Primary Health Center in Bodwad taluka were like ' | बोदवड तालुक्यातील येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या ‘जैसे थे’च

बोदवड तालुक्यातील येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या ‘जैसे थे’च

googlenewsNext
ठळक मुद्देसुविधांअभावी रुग्णांचे हालनिम्मा तालुका आरोग्य केंद्राला जोडलेला असतानाही सुविधा मिळणे होेते दुरापास्त

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रुग्णांचे व येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे २८ गावे जोडली असून जवळपास निम्मा तालुका या प्राथमिक आरोग्य केंद्रास जोडला आहे. तरी या आरोग्य केंद्रात दूरवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा नसल्याने अनेक वेळा येथील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून औषध साठा घेण्याचा रुग्णांना सल्ला देतात. येथील रुग्णाच्या रक्त व लघवीचे नमुने हे तपासणीसाठी पाठविले असता ते १५-१५दिवस त्यांचे रिपोर्ट रुग्णालयात प्राप्त होत नसल्याने रुग्णांकडून अनेक वेळा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तसेच या ठिकाणी गरोदर महिलांसाठी मानव विकास कार्यक्रम घेण्यात येतात. त्या महिलांना मध्यान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत. परंतु तोही सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा महिला करतात या भोजनाची व्यवस्था रुग्णालयाच्या अवारात उघड्यावर करण्यात येतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना शासनाच्यावतीने जी आर्थिक मदत मिळते ती मदत वर्ष उलटूनही मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी अनेकदा केलेल्या आहे व येथील महिलेने आर्थिक मदतीबाबत विचारणा केली असता त्या महिलेला टोलवाटोलवीची उत्तरे या महिलेस देण्यात येतात.
याचबरोबर येथील रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात तर त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करून येथील रुग्णालय परिसरात पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली आहे. या टाकीमध्ये अद्यापही पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आला नाही व हजारो रुपये खर्च करून पाण्याचे आर.ओ.मशीन हे पाण्याअभावी धूळखात पडून आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे आहे त्या एकच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे. तेही या रुग्णालयात मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णाना रात्रीच्या वेळेस उपचार घेणे असल्यास रुग्णांना वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.
रुग्णालयातील काही कर्मचारी ही मुख्यालयीन राहत नसल्याने व कार्यालयीन वेळेवर येत असल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. गरोदर व प्रसूतीसाठीच्या महिलांसाठी शासनाच्यावतीने १०२ ही रुग्णवाहिका येथील रुग्णालयात कार्यरत असतानाही राजकीय दबावापोटी येथील रुग्णवाहिका मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली. येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना प्रसूतीसाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लगतो. खासगी वाहनास जर अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न तालुका आरोग्य अधिकारी व येथील वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता ती आमची जबाबदारी नाही, असे सांगून जबाबदारी झटकली जाते, असा रुग्णांचा आरोप आहे. दरम्यान , या आरोग्य केंद्रातील समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून ‘जैसे थे’च आहेत.

Web Title: Problems in Yevati Primary Health Center in Bodwad taluka were like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.