साकळी येथे विहिरीत पडलेल्या पत्नीचे पतीने वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:06 PM2018-03-03T13:06:15+5:302018-03-03T13:06:15+5:30

१५० फूट विहिरीत पडली होती विवाहिता

Pran survived the husband's wife lying in a well | साकळी येथे विहिरीत पडलेल्या पत्नीचे पतीने वाचविले प्राण

साकळी येथे विहिरीत पडलेल्या पत्नीचे पतीने वाचविले प्राण

Next
ठळक मुद्दे रुणालयात उपचारवेळीच धाव घेतल्याने दोघे सुखरुप

आॅनलाईन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि.२ - यावल तालुक्यातील साकळी येथील २५ वर्षीय विवाहिता १५० फूट विहिरीत पडली असता पतीने विहिरीत तात्काळ उतरत तिला वाचविले. ही घटना शनिवारी सकाळी साउेआठ वाजता घडली.
साकळी येथील जरीना लतीब तडवी (वय २५) ही नावरे शिवारातील देविदास पाटील यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी सकाळी पडली. विवाहितेच्या पतीस घटना माहित पडताच लतीब कासम तडवी यांनी तात्काळ विहिरीत उतरला तेव्हा शिरसाड येथील अमरसिंग छत्रीसिंग बारेला व साकळी येथील बाळू छबू तडवी या दोघांनी लतीबला सहकार्य करत विवाहितेचा जीव वाचविला. विवाहिता व तीचा पती लतीब तडवी यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्या दोघांना जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Pran survived the husband's wife lying in a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yawalयावल