निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या जळगावातील ८० उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:33 PM2018-07-25T21:33:26+5:302018-07-25T21:35:17+5:30

मनपा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ‘ट्रू वोटर’ अ‍ॅपच्या सहाय्याने दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, २२३ उमेदवारांनी खर्च सादर केला असून, ८० उमेदवारांनी अद्याप आपला दैनंदिन खर्च सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक खर्च विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Notice to 80 candidates from Jalgaon who did not submit the election expenses | निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या जळगावातील ८० उमेदवारांना नोटीस

निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या जळगावातील ८० उमेदवारांना नोटीस

Next
ठळक मुद्देतत्काळ खर्च न सादर केल्यास गुन्हे दाखल करणार८ उमेदवारांच्या खर्चात तफावत२४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचा सूचना

जळगाव - मनपा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ‘ट्रू वोटर’ अ‍ॅपच्या सहाय्याने दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, २२३ उमेदवारांनी खर्च सादर केला असून, ८० उमेदवारांनी अद्याप आपला दैनंदिन खर्च सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक खर्च विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, या उमेदवारांनी तत्काळ खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सूचना निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिल्या आहेत. मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक विभागाकडे सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. मात्र, पंधरा दिवस उलटूनही अद्याप ८० उमेदवारांनी एकाही दिवसाचा खर्च सादर केलेला नाही. याबाबत या सर्व उमेदवारांना निवडणूक विभागाकडून मोबाईल संदेश पाठवून खर्च सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, सूचना दिल्यानंतरही या उमेदवारांनी आपला खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Notice to 80 candidates from Jalgaon who did not submit the election expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.