फलोत्पादक व शेतीमाल उत्पादक कंपन्यांसाठी उभारणार नवीन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:38 PM2018-12-12T19:38:32+5:302018-12-12T19:40:45+5:30

राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार यांची कार्यशाळा मुंबईत झाल्याची माहिती श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील व केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे दर्शन पाटील यांनी दिली.

New project to be set up for horticultural and agricultural producer companies | फलोत्पादक व शेतीमाल उत्पादक कंपन्यांसाठी उभारणार नवीन प्रकल्प

फलोत्पादक व शेतीमाल उत्पादक कंपन्यांसाठी उभारणार नवीन प्रकल्प

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी कार्यशाळामुंबईत झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत रावेरमधील फलोत्पादकांचा सहभागदलालांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नियोजन करणार

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरीशेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार यांची कार्यशाळा मुंबईत झाल्याची माहिती श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील व केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे दर्शन पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ या फळपीक उत्पादक तथा राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्यांच्या व घाऊक बाजारपेठे दरम्यान मध्यस्थानीअसलेल्या नफेखोर व्यापारी दलालांचे समूळ उच्चाटन करून त्यांना स्थानिक बाजारपेठा उपलब्ध करणे, निर्यातीसाठी वाटा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया केंद्र्र उभारण्याच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या पुढाकार घेऊन नवीन प्रकल्पाची नव्याने सुरूवात करीत आहेत.
त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी उत्पादित शेतमाल कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार व पणन महामंडळाचे संचालक मंडळ यांची कार्यशाळा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. मुख्यमंत्री सहाय्यक विधीआयुक्त परदेशी यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनाने सुरूवात करण्यात आली. या कार्यशाळेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक मिओ झोक यांची विशेष उपस्थिती होती. राज्यातील ५० शेतकरी उत्पादित कंपन्यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. रावेर येथील श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक रमेश पाटील व किशोर पाटील उपस्थित होते.

Web Title: New project to be set up for horticultural and agricultural producer companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.