‘हमसफर’ची अमळनेरला पाठ, पकडला नंदुरबारचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:32 AM2017-08-14T00:32:09+5:302017-08-14T00:38:20+5:30

अमळनेरात थांब्यासाठी आंदोलनाचे हत्यार : खासदार ए.टी. पाटील उशिरापर्यंत थांबून

Nandurbar's hand caught, reading Amslare's 'Hamsafar' | ‘हमसफर’ची अमळनेरला पाठ, पकडला नंदुरबारचा हात

‘हमसफर’ची अमळनेरला पाठ, पकडला नंदुरबारचा हात

Next
ठळक मुद्देहोळ ते दोंडाईचा मार्गाची चाचणी १४ आॅगस्टलानियोजीत थांबा अचानक रद्दप्रभूंच्या हस्ते आॅनलाइन लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर/ नंदुरबार : पश्चिम रेल्वेतर्फे रविवारपासून सुरू करण्यात आलेल्या वांद्रे टर्मिनस-पटना साप्ताहिक ‘हमसफर’ एक्स्प्रेसचा अमळनेर स्थानकावरील नियोजीत थांबा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जळगावच्या खासदारांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचवेळी दुसरीकडे नंदुरबारला या गाडीला थांबा देण्यात आल्याने ‘हमसफर’ने अमळनेरची साथ सोडून नंदुरबारचा हात धरल्याची चर्चा आहे.
अमळनेरात या गाडीला थांबा मिळावा, यासाठी भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांची रेल्वेच्या अधिकाºयांशी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
अमळनेर, नंदुरबार येथून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर थेट मुंबईला जाण्यासाठी प्रवासी गाडी सुरू करावी अशी प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात वांद्रे टर्मिनस-पटना या साप्ताहिक गाडीची घोषणा केली होती. ही गाडी वातानुकूलित असून, ती वापी, बलसाड, उधना, नंदुरबार, भुसावळ, इटारसील कटनी, मुगलसरायमार्गे जाणार आहे.
या रेल्वेची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा तिला अमळनेर स्थानकावर थांबा मंजूर झालेला होता. त्यानुसार अमळनेरच्या रेल्वे वेळापत्रकाच्या फलकावर त्याची नोंदही घेण्यात आलेली होती. या नवीन गाडीचा शुभारंभ रविवारी मुंबईतून झाला. मात्र या गाडीला अमळनेरला थांबाच नसल्याचे काही कार्यकर्त्यांनी खासदार ए.टी.पाटील यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर खासदारांनी प्रयत्न सुरू केल्यावर यंत्रणा हलली.
खासदार पाटील यांनी रेल्वेचे महाप्रबंधक ए.के. गुप्ता, पश्चिम रेल्वेचे प्रबंधक मुकुल जैन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे सचिव पिंगळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या नवीन गाडीला अमळनेरला थांबा पूर्ववत ठेवावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अधिकाºयांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे खासदारांचाही संताप झाला.
तापी सेक्शनमध्ये केवळ उधना, नंदुरबार व भुसावळ येथेच या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. दर रविवारी पटना जाण्यासाठी रात्री साडेआठ वाजता नंदुरबारला तर सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता भुसावळला येणार आहे. लवकरच उधना-जयनगर अंत्योदय एक्स्प्रेस व वडोदरा-वाराणसी महामना एक्स्प्रेसचा समावेश आहे.
यापूर्वी ही चाचणी ११ आॅगस्ट रोजी होणार होती. सोमवार, १४ रोजी सायंकाळी चार ते सात वाजेदरम्यान ही चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता एस.सी.बैरवा यांनी दिली.
अमळनेर ते होळ व नंदुरबार ते चिंचपाडा मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाचे लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी दुपारी तीन वाजता आॅनलाइन करण्यात आले. आता या मार्गावर सर्वच प्रकारच्या रेल्वेगाड्या धावणार आहेत.

Web Title: Nandurbar's hand caught, reading Amslare's 'Hamsafar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.