जळगाव येथे ईदच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:06 PM2018-06-14T13:06:38+5:302018-06-14T13:06:38+5:30

उत्साह

In the market for the purchase of Eid | जळगाव येथे ईदच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

जळगाव येथे ईदच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

Next
ठळक मुद्देशिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात खरेदीमहागाईचा काहीसा परिणाम

जळगाव : मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा रमजान ईद सण अवघ्या दोन दिवसांवर (१५ रोजी चंद्रदर्शन झाल्यास) आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध मार्केट व कॉलनींमध्ये गर्दी होत असून समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
रमजान महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारात ईदच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी अनेकजण बाहेर पडल्याने बाजारपेठ फुलली आहे.
शहराच्या अतिशय मध्यवर्ती आणि सर्व प्रकारच्या चीजवस्तू हमखास मिळणाऱ्या फुले मार्केट आणि परिसरात महिला, लहान मुलंमुलींची झुंबड उडत आहे. सर्व प्रकारची पादत्राणे, कपडे, बेन्टेक्स ज्वेलरी, अत्तर, सुरमा, घरगुती साºया वस्तू येथे मिळत असल्याने एकाच वेळी मनासारखी आणि हव्या त्या किमतीची वस्तू घेण्यासाठी ही लगबग वाढली आहे.
रेडिमेड कपड्यांकडे कल
युवा पिढीचा कल तयार कपड्यांकडे आहे. शहरात अनेक नामवंत कंपन्यांची दालने (शोरुम) आहेत, ऐपतदार वर्ग त्याकडे वळत आहे. अर्थात ते खिशाला नाही परवडले तर पारंपरिक, व्यवसाय-उद्योगाला योग्य कपडे आपल्या टेलरकडून वाजवी दरात शिवणाºयांची संख्याही कमी नाही.
शिरखुर्म्याचीही तयारी
सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव शिरखुर्मा तयार करून समाज बांधवांसह हिंदू बांधवांनाही आपुलकीने आमंत्रित करतात. या शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामध्ये सुक्यामेव्यासह शेवयांचीही मागणी वाढली आहे.
महागाईचा काहीसा परिणाम
बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन खरेदी केली असली तरी अनेकजण हाताला आवर घालताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पावसाची दडी यामुळे हे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. एरव्ही प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान महिन्यात व ईदसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करतातच. त्यामुळे महागाई वाढत असली तरी रमजान सणासाठी खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.

 

 

Web Title: In the market for the purchase of Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.