पारोळा उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 03:47 PM2019-05-16T15:47:33+5:302019-05-16T15:47:38+5:30

बिनविरोध निवड

Mangesh Tambe as the head of Parola suburban | पारोळा उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे

पारोळा उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे

googlenewsNext


पारोळा : न.पा. उपनगराध्यक्षपदी बांधकाम समिती सभापती व नगरसेवक मंगेश सुधाकर तांबे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.
सकाळी ११ वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार अनिल गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे गटनेते दीपक अनुष्ठान व बांधकाम सभापती मंगेश सुधाकर तांबे यांनी नामनिर्देशन केले होते. पण अनुष्ठान यांनी माघार घेतल्याने अनिल गवांदे यांनी उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. ठरल्याप्रमाणे कैलास चौधरी यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी ही निवड घेण्यात आली. प्रसंगी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने उपस्थित होते
प्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोक वाणी , पाणी पुरवठा समिती सभापती मनिष पाटील, गटनेते बापू महाजन, शिवसेना गटनेते दीपक अनुष्ठान, नगरसेवक प्रकाश महाजन, नवल चौधरी, अशोक चौधरी, पी. जी. पाटील, शविआच्या गटनेत्या वंदना शिरोळे, नगरसेविका वर्षा पाटील, रेखा चौधरी, वैशाली पाटील, छाया पाटील, जयश्री बडगुजर, सुनिता वाणी, अलका महाजन, सुधाकर पाटील, अ‍ॅड. तुषार पाटील, प्रा. राजेश पाटील, संजय पाटील, अरुण चौधरी, संजय चौधरी, हरीश पाठक,एम. बी. मोहरीर, गणेश बारी आदी उपस्थित होते.

Web Title: Mangesh Tambe as the head of Parola suburban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.