साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘पोटमारा’ कादंबरी अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:48 AM2018-07-29T01:48:49+5:302018-07-29T01:48:57+5:30

साहित्यिकामुळे पहूरपेठ गावाला मिळाला सन्मान

Literature Ravindra Pandhare's novel 'Potamma' in the novel syllabus | साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘पोटमारा’ कादंबरी अभ्यासक्रमात

साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘पोटमारा’ कादंबरी अभ्यासक्रमात

Next
<p>पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पेठमधील रहिवासी तथा साहित्यिक रवींद्र पांढरे यांच्या ‘पोटमारा’ या कादंबरीचा २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापिठाअंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयांच्या एम.ए.मराठी भाग दोन या वर्गांच्या अभ्यासक्रमातील अभ्यासपत्रिका क्रमांक पाच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्य प्रवाह यातील ग्रामीण साहित्य प्रवाहासाठी प्रातिनिधिक साहित्यकृती म्हणून पोटमारा ही कादंबरी यासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरूणाची शोकांत कहाणी या कादंबरीतून जामनेरी बोलीत कथन करण्यात आले आहे. त्यांच्या मातीतली माणसे या कथा संग्रहाला राज्यशासनाचा व कोपरगाव येथील रोहमारे ट्रस्टचा असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहे. तसेच अवघाची संसार या कादंबरीच्या कथानकावर आधारित घुसमट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Literature Ravindra Pandhare's novel 'Potamma' in the novel syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.